फतेहाबाद, 30 ऑगस्ट : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जास्तीत जास्त लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र कोरोना टेस्टिंग दरम्यान हरियाणाच्या (Hariyana) फतेहाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एका व्यक्तीने मेडिकल ऑफिसरला सांगितले की, "मी मरेन किंवा मारेन पण कोरोना चाचणीसाठी सॅम्पल देणार नाही". या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फतेहाबाद जिल्ह्यातील धरसूल या गावात कोरोनाबाधित महिलेच्या वकील मुलाचे नमुना घेतल्यानंतर त्यांनी डॉक्टरांसमवेत सर्वांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले होते. तक्रारीनुसार, हा तरुण हातात काठी घेऊन डॉक्टर व आरोग्य विभागाच्या पथकाला धमकी देत राहिला. तबब्ल 20 मिनिटे हायवोल्टेज नाटक सुरू होते.
वाचा-...आणि 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपून आरोपीला पकडलं, पाहा खऱ्या सिंघमचा VIDEO
वाचा-दुचाकीस्वारांकडून वकिलाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार, पाहा थरारक VIDEO
अधिकाऱ्यांसोबत झाला वाद
या व्यक्तीने टेस्टिंगसाठी आलेल्या मेडिकल ऑफिसर डॉ. हनुमान यांच्याशी वाद घातला. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती, "मी मरेन किंवा मारेन पण कोरोना चाचणीसाठी सॅम्पल देणार नाही". असे म्हणताना दिसत आहे. पोलीस कारवाईबाबत माहिती देताना डीएसपी अजय्यब सिंह म्हणाले की, या प्रकरणात वकीलाने आरोग्य विभागाच्या पथकाची बदनामी करुन कोव्हिड-19 नमुना देण्यास नकार दिला. या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
वाचा-'...नाहीतर एकाचा गळा चिरून दुसरा लावू', लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO VIRAL
देशात आज सापडले 78 हजारहून अधिक रुग्ण
ऑगस्टच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात पहिल्यांदाच 78 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 लाख 42 हजार 734 वर पोहोचला आहे. तर मृत्यू झालेल्यांचा आतापर्यंतचा आकडा 63,498 वर पोहोचला आहे.