करनाल, 22 डिसेंबर : लग्न कशावरून खोडे घातली जातील याचा कधी काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी वऱ्हाडी मंडळींना जेवण आवडलं नाही म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची घटना समोर आली होती. अनेकदा हुंड्यावरून घासाघिस होत असते आणि त्यातून लग्न मोडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यात मिळालेली गाडी मोठी नाही म्हणून नवरदेवानं वऱ्हाडीमंडळी लग्नाला आलीच नाहीत.
नवऱ्या मुलीकडच्या नातेवाईकांनी मोठी गाडी न दिल्यानं नवरदेव आणि वरमंडळी रूसली आणि लग्न मोडलं. नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी लग्नाला आलीच नाहीत. लग्नमंडपात एकटी वधू त्यांची वाट पाहात ताटकळत बसली होती.
हरियाणातील मेरठ रोडमध्ये असलेल्या हनुमान कॉलनीत राहणार्या मुस्लीम कुटुंबातील ही घटना आहे. या घरात 20 डिसेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार होती. वधूच्या वडिलांनी सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न जुळवण्याचे वर्षभरापासून सुरू होते. मुलाकडील मंडळींनी 1100 रुपये देऊन विवाह पक्का केला. नवरदेवाचे फर्निचरचे शोरूम आहे. तरीदेखील मुलीकडच्यांनी फर्निचर द्यावे असा अट्टाहास केला. मुलाने लग्नाचं वचन दिलं आणि लग्नाची तयारी सुरू झाली.
हे वाचा-पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार!
लग्नाची तयारी सगळी पूर्ण झाली आणि ऐन मुहूर्तावर वर पक्षानं लग्नासाठी नकार दिला. दोन्ही बाजूचा पेच सोडवण्यासाठी गावात पंचायत बोलवावी लागली. या मुलीने अल्टो कारसह 10 लाखापर्यंत वस्तू देण्यास तयार होण्यास मान्य केले, परंतु अद्याप वर पक्षाचे लोक या प्रस्तावाला सहमत नाहीत. त्यांनी गाडी छोटी देत असल्याच्या प्रस्तावावर बोट दाखवत लग्न करण्यास नकार दिला आहे.