EXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल, असा न्यूज 18 हिंदी आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज आहे. इथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 09:21 PM IST

EXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज

मुंबई, 21 ऑक्टोबर : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल, असा न्यूज 18 हिंदी आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज आहे. भाजपला इथे 75 जागा मिळतील तर काँग्रेसला 10 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला भोपळाही फोडता येणार नाही. अकाली दलाला इथे 1 जागा मिळू शकेल. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याने पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार,अशी शक्यता आहे.हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते. इथे मुख्य लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होती.

महाराष्ट्रातही भाजप सरकार

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे.

(हेही वाचा : EXIT POLL 2019 : वंचित आणि MIM चं काय होणार? IPSOS आणि News 18 लोकमतच्या एक्झिट)

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

Loading...

================================================================================

मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री गेले सायकलवर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...