भाजपच्या हातून निसटलं हरियाणा, आता सत्तेच्या चाव्या या नेत्याकडे

भाजपच्या हातून निसटलं हरियाणा, आता सत्तेच्या चाव्या या नेत्याकडे

हरियाणामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आता दुष्यंत कुमार चौटाला यांची जन नायक जनता पार्टी किंगमेकरची भूमिका निभावणार आहे. दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसतर्फे दिलेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर फेटाळून लावलीय.

  • Share this:

चंदिगड, 24 ऑक्टोबर : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इथे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही.  हरियाणामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आता दुष्यंत कुमार चौटाला यांची जन नायक जनता पार्टी किंगमेकरची भूमिका निभावणार आहे. दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसतर्फे दिलेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर फेटाळली आहे. या स्थितीत भाजप आणि काँग्रेस हे दोघेही दुष्यंतकुमार चौटालांची मनधरणी करतायत.

दुष्यंत चौटाला कुणाच्या बाजूने?

हरियाणाच्या 90 जागांपैकी भाजपला 39 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 30 जागा मिळाल्या आहेत. दुष्यंतकुमार चौटाला यांच्या जन नायक जनता पक्षाला 12 जागा मिळाल्या.  भाजपने दुष्यंत चौटाला यांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी प्रकाश सिंह बादल यांच्यावर सोपवली आहे.बादल कुटुंबीयांचे चौटाला यांच्याशी चांगले संबंध आहेत.

(हेही वाचा : शरद पवारांची घोषणा, साताऱ्यामध्ये जाऊन जनतेचे आभार मानणार!)

जेव्हा अजय आणि अभय चौटाला यांच्यात INLD पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वाद झाले तेव्हा बादल कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले होते पण त्याला यश आलं नाही.  अखेर डिसेंबर 2018 मध्ये अजय चौटाला यांची मुलं दुष्यंत आणि दिग्विजय यांनी एकत्र येऊन जननायक जनता पार्टीची स्थापना केली.

=====================================================================================

LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading