Hariyana Assembly Election 2019 : भारताच्या माजी कर्णधाराचा विजय, तर 'या' पैलवानांना कॉंग्रेसनं पछाडलं

Hariyana Assembly Election 2019 : भारताच्या माजी कर्णधाराचा विजय, तर 'या' पैलवानांना कॉंग्रेसनं पछाडलं

Hariyana Assembly Election 2019 : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला.

  • Share this:

चंदिगड, 24 ऑक्टोबर : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इथे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही. हरियाणामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. यात भारताचा हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगनं विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. संदीप सिंग हरियाणातील कुरूक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा येथून उमेदवारीसाठी उभा राहिला होता.

संदीप सिंगनं या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या मनदीप सिंग यांचा 5 हजार 314 मतांनी पराभव केला. दरम्यान हरियाणामधून भाजपकडून तीन खेळाडू आपले नशीब आजमावत होते. यात संदीप सिंहनं बाजी मारली तर पैलवान बबीता फोगट आणि योगेश्वर दत्त यांना पराभव सहन करावा लागला.

भारताकडून हॉकी संघाचे नेतृत्व करणाऱ्या संदीप सिंगची तरूणांमध्ये चांगली लोकप्रियता होती. दरम्यान पेहोवामध्ये संदीप पहिल्या फेरीपासून आघाडीवर होता. दुसरीकडे भाजपची दंगल गर्ल बबीता फोगट आणि योगेश्वर दत्त यांचा मानहानीकारक पराभव झाला.

बबीता फोगटनं 2014 आणि 2018मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मात्र त्यानंतर हरियाणामध्ये बबीतानं भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, मात्र ही जागा जिंकता आली नाही.

दुसरीकडे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकविजेता योगेश्वर दत्त बडौदा विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या कृष्ण हुड्डा यांच्याविरोधात उभा होता. मात्र योगेश्वर 30 हजार 307 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.

दुष्यंत चौटाला कुणाच्या बाजूने?

हरियाणाच्या 90 जागांपैकी भाजपला 39 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 30 जागा मिळाल्या आहेत. दुष्यंतकुमार चौटाला यांच्या जन नायक जनता पक्षाला 12 जागा मिळाल्या. भाजपने दुष्यंत चौटाला यांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी प्रकाश सिंह बादल यांच्यावर सोपवली आहे.बादल कुटुंबीयांचे चौटाला यांच्याशी चांगले संबंध आहेत. जेव्हा अजय आणि अभय चौटाला यांच्यात INLD पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वाद झाले तेव्हा बादल कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले होते पण त्याला यश आलं नाही. अखेर डिसेंबर 2018 मध्ये अजय चौटाला यांची मुलं दुष्यंत आणि दिग्विजय यांनी एकत्र येऊन जननायक जनता पार्टीची स्थापना केली.

First published: October 24, 2019, 7:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading