VIDEO : या 2 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं पातेल्यात अडकलं अन् ते कसं काढावं लागलं पाहा...

VIDEO : या 2 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं पातेल्यात अडकलं अन् ते कसं काढावं लागलं पाहा...

खेळता खेळता 2 वर्षाच्या सलोनीचं डोकं पातेल्यात अडकलं. ते निघता निघेना. शेजार-पाजारचे आणि गावातले अनेक लोक तिथे जमले. शेवटी आरीने पातेलं कापून तिचं डोकं बाहेर काढण्यात आलं. सलोनीचं डोकं भांड्यातून निघालं. तिने मोकळा श्वास घेतला आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडला.

  • Share this:

हरदोई (उत्तर प्रदेश), 9 जुलै :  दोन वर्षांच्या चिमुरडीचं डोकं पातेल्यात अडकलं आणि ते काढायला अॅल्युमिनियमचं पातेलच कापावं लागलं. ही घटना घडली एका छोट्या गावात. भांड्यातून डोकं बाहेर निघालं तेव्हा घरच्यांचाच नाही, तर साऱ्या गावाचा जीव भांड्यात पडला. दोन वर्षांची सलोनी घरात खेळत असताना स्वयंपाकघरात लुडबूड करायला लागली. तिथल्या भांड्यांशी  खेळता खेळता तिने एक पातेलं चक्क डोक्यावर ठेवलं.

काही कळायच्या आत त्या पातेल्यात त्या मुलीचं डोकं अडकलं. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून घरातले सगळे धावत आले. त्यांनी पातेल्यातून डोकं बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिचं डोकं त्या अॅल्युमिनियमच्या पातेल्यात आणखीनच अडकलं. त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला. शेवटी ते भांडं कापून तिचं डोकं बाहेर काढावं लागलं.

उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये ही घटना घडली. पचदेवरा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनंगपूर गावात मंगळवारी सकाळी रामबरन यांच्या घरातून छोट्या सलोनीचा रडण्याचा आवाज यायला लागला. खेळता खेळता 2 वर्षाच्या सलोनीचं डोकं पातेल्यात अडकलं. ते निघता निघेना. शेजार-पाजारचे आणि गावातले अनेक लोक तिथे जमले. शेवटी आरीने पातेलं कापून तिचं डोकं बाहेर काढण्यात आलं. सलोनीचं डोकं भांड्यातून निघालं. तिने मोकळा श्वास घेतला आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 08:47 PM IST

ताज्या बातम्या