News18 Lokmat

हार्दिक पटेल निवडणूक लढू शकणार नाही? हे आहे कारण!

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरातल्या विसनगर कोर्टाने 25 जुलै 2018ला सरकारी संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2019 04:38 PM IST

हार्दिक पटेल निवडणूक लढू शकणार नाही? हे आहे कारण!

अहमदनगर 29 मार्च : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक यांच्या विरुद्धच्या प्रकरणांवर स्थगिती देण्यास नकार दिल्याने त्याच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पक्षाने त्याला उमेदवार म्हणून घोषीतही केलं आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून केलेल्या आंदोलनात हार्दिक पटेल विरुद्ध विविध 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असले तर निवडणूक लढवायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे या प्रकरणांना स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका  हार्दीकने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणावर आता पुढच्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तर 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

उच्च न्यायालयात खटला सुरू असताना उमेदवारी अर्ज केल्यास तो अर्ज बाद केला जाऊ शकतो. आता या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हार्दीक पटेल यांनी सांगितलं आहे.

हार्दीकला झाली होती शिक्षा

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरातल्या विसनगर कोर्टाने 25 जुलै 2018ला सरकारी संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. दंगल भडकावने आणि जाळपोळ करणे असे आरोपही हार्दिक आणि त्यांच्या दोन सहाकाऱ्यांवर ठेवण्यात आले आहेत. त्याचबोरबर प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा दोन वर्षांची असल्याने हार्दिक, लालजी आणि ए.के. पटेल यांना जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला.पाटील समाजाच्या आंदोलनादरम्यान मेहसाणा जिल्ह्यातल्या विषनगरचे भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचं हे प्रकरण आहे. हार्दीक पटेल आणि त्यांचे सहकारी याला जबाबदार आहेत असा त्यांच्यावर आरोप होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...