उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली, तरीही उपोषणावर ठाम

गुजरात सरकारनं हार्दिक पटेलचं उपोषण हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याचं सांगतलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2018 09:03 AM IST

उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली, तरीही उपोषणावर ठाम

गुजरात, ०८ सप्टेंबर- गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली आहे. हार्दिक पटेलला सोल सिविल रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. पाटीदार नेता नरेश पटेल यांनी हार्दिक यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याचा आग्रह केला. मात्र हार्दिक पटेल अजूनही उपोषणावर ठाम आहे. पाटीदार समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल उपोषणाला बसलाय. हार्दिकची प्रकृती खालावत असताना गुजरात सरकारनं हार्दिक पटेलचं उपोषण हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याचं सांगतलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणास बसलेल्या पाटिदार नेता हार्दिक पटेलला काही बरंवाईट झाल्यास मोदी- शहा यांना गुजरामध्ये जाऊन चहा-पकोडे विकण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांच्यासह अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन हार्दिकची भेट घेतली त्यानंतर त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणाला पाठींबा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं. मात्र हार्दिक पटेलने उपोषण करु नये अशी इच्छा उद्धव यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 'हार्दिक हा लढवैय्या आहे. जे लढवय्यै असतात ते कधीच उपोषणाला बसत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उपोषणाला बसणं कधीच मान्य नव्हतं. हार्दिकची गुजरातला गरज आहे. त्यामुळे त्याने उपोषण करु नये,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close