हार्दिक पटेल पकडणार काँग्रेसचा 'हात'; या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 12:54 PM IST

हार्दिक पटेल पकडणार काँग्रेसचा 'हात'; या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

जामनगर, 7 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर भाजपला पराभूत करण्यासाठी आता काँग्रेसनं कंबर कसली आहे. त्यासाठी आता काँग्रेसला पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी 'हात' दिला आहे. लवकरच हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, 12 मार्च रोजी याबद्दलची घोषणा केली जाणार असून जामनगरमधून हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यावर बोलण्यास हार्दिक पटेल यांनी मात्र नकार दिला आहे.

12 मार्च रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीची अहमदाबाद येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या रूपानं काँग्रेसनं भाजपसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जामनगरमधील निवडणूक देखील अधिक चुरशीची होणार आहे.


पाटीदार समाज आणि भाजप

Loading...

2014मध्ये भाजपनं गुजरातमध्ये सर्व जागांवर विजय मिळवला होता. पण, पाच वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. कारण, मधल्या काळात पाटीदार समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं. त्यासाठी हार्दिक पटेल यांना अटक देखील केली गेली. शिवाय, हार्दिक पटेल यांनी उपोषणाचं हत्यार देखील उपसलं होतं. या सर्व घडामोडी पाहता पाटीदार समाज हा भाजपला किती प्रमाणात साथ देईल हे निवडणुकांच्या निकालाअंती स्पष्ट होईल.


सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणांना दांडक्याने मारहाण


काँग्रेसचे ओबीसी नेते भाजपच्या वाटेवर?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांनी मंत्री केलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांदरम्यान अल्पेश ठाकूर यांनी पक्षानं दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नाराज अल्पेश ठाकूर भाजपचा 'हात' पकडण्याची शक्यता आहे. यापूर्वी काँग्रेस आमदार हकुभा जडेजा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना देखील मंत्रीपद दिलं गेलं होतं. त्यानंतर 2017मध्ये हकुभा जडेजा भाजपच्या तिकीटावर जिंकून आले होते.


अपघातानंतर पळ काढणाऱ्याला असं अडवलं दुसऱ्या कारचालकानं; पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...