News18 Lokmat

भाजप-काँग्रेस सारखेच-हार्दिक पटेल

'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 09:10 AM IST

भाजप-काँग्रेस सारखेच-हार्दिक पटेल

अहमदाबाद,22 नोव्हेंबर: भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच असल्याची टीका काल हार्दिक पटेलने केली आहे. तो अहमदाबाद जिल्ह्यात एका सभेत बोलत होता.

'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे. 4-5 जागांसाठी शहीद झालेल्या पाटीदार बांधवांना आपण विसरलं नाही पाहिजे असं ही त्याने सांगितलं.

तसंच  इतके दिवस काँग्रेसशी वाटाघाटी करणार हार्दिक पटेल आता कुणाचं तिकीट नकोच, असा दावा करतोय.  'मला कुणाचंही तिकीट नको. मला फक्त पाटीदार समाजाचं भलं हवं आहे' असंही हार्दिकने यावेळी स्पष्ट केलं.

सध्या काँग्रेस-हार्दिक पटेलमध्ये जागांवरून वाद सुरू आहे. अशी बातमी आली होती की हार्दिकला ११ जागा हव्या आहेत, तर राहुल गांधी फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...