'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को?'

'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को?'

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यांच्यावर सध्या 'एम्स'मध्ये उपचार सुरू आहेत.

  • Share this:

गांधीनगर, 18 जानेवारी : 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को?' असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे. स्वाईन फ्ल्यू झाल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या रुग्णायलात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी शहांचे नाव न घेता हे वादग्रस्त ट्वीट केलं आहे.

'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को? राष्ट्रधर्म का पालन हों।' असं ट्वीट हार्दिक पटेल यांनी केलं आहे. हार्दिक यांच्या या ट्वीटनंतर मोठा वाद तयार झाला आहे. कारण हार्दिक यांनी अप्रत्यक्षपणे अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांची थट्टा केल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस नेत्याचंही वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कुठल्याही विषयाचं राजकारण करायला राजकीय पक्षांना फक्त निमित्तच हवं असतं. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यांच्यावर सध्या 'एम्स'मध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती खुद्द अमित शहांनीच ट्विटवरून दिली होती. त्यावर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी दिलेली प्रतिक्रिया आता वादाचं कारण ठरली.

हरिप्रसाद म्हणाले, कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याची अमित शहांना घाई झाली होती. पण काँग्रेसचे आमदार परत आल्याने त्यांना धक्का बसला असावा. त्यामुळेच त्यांना ताप आला आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या प्रतिक्रियेवर राजकारण झालं नसतं तरच नवल.

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी शहांच्या प्रकृतीवरून ज्या असभ्य आणि खालच्या स्तरावरच्या भाषेचा प्रयोग केला तो काँग्रेसच्या विचारांचा स्तर दर्शवतो असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

भाजपने एक ट्विट करत शहांच्या प्रकृतीविषयी माहितीही दिली आहे. शहा यांची प्रकृती चांगली असून योग्य उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळेल अशी माहितीही त्यात देण्यात आलीय.

VIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी

First published: January 18, 2019, 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading