आज आणि उद्या भाजप ईव्हीएममध्ये गडबड करणार -हार्दिक पटेल

आज आणि उद्या भाजप ईव्हीएममध्ये गडबड करणार -हार्दिक पटेल

हार्दिक पटेल यांनी टि्वट करून भाजपवर गंभीर आरोप केला.

  • Share this:

15 डिसेंबर : गुजरातमध्ये भाजपला पराभव दिसतोय. त्यामुळे आज आणि उद्या भाजप ईव्हीएममध्ये गडबड करणार असल्याचं धक्कादायक वक्तव्य पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी केलंय.

हार्दिक पटेल यांनी टि्वट करून भाजपवर गंभीर आरोप केला. आज शनिवारी आणि रविवारीच्या रात्री भाजप ईव्हीएममध्ये गडबड करणार आहे. त्यांना आपला पराभव दिसत आहे असं टि्वट पटेल यांनी केलं.

गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला तर भाजपला हा मोठा धक्का आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड करून भाजप विजयाचा प्रयत्न करणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होणार आहे त्यामुळे भाजपवर संशय येणार नाही असंही पटेल म्हणाले. तसंच भाजपला फार फार तर 82 जागा मिळतील आणि काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार असं भाकितही त्यांनी वर्तवलंय.

गुजरात निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येण्याबद्दल नाना पटोले यांच्याशीही झाली आहे. उलट मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत यायला आवडेल. पटोले यांच्या लढाईत मी सोबत आहे असंही पटेल म्हणाले.

First published: December 16, 2017, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading