मराठी बातम्या /बातम्या /देश /काबूलमधून बाहेर काढलेले 78 लोक दिल्लीला पोहोचले, श्री गुरु ग्रंथ साहिबचे 3 सरूप केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी घेतले डोक्यावर

काबूलमधून बाहेर काढलेले 78 लोक दिल्लीला पोहोचले, श्री गुरु ग्रंथ साहिबचे 3 सरूप केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी घेतले डोक्यावर

काबूलच्या गुरुद्वारांमधून काढलेले तीन श्री गुरु ग्रंथ साहिब (Sri Guru Granth Sahib)  देखील या विमानातून आणण्यात आले आहेत.

काबूलच्या गुरुद्वारांमधून काढलेले तीन श्री गुरु ग्रंथ साहिब (Sri Guru Granth Sahib) देखील या विमानातून आणण्यात आले आहेत.

काबूलच्या गुरुद्वारांमधून काढलेले तीन श्री गुरु ग्रंथ साहिब (Sri Guru Granth Sahib) देखील या विमानातून आणण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban)कब्जा केल्यानंतर काबूलमधून (Kabul) भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.आज एअर इंडियाचे AI-1956 विमान 78 लोकांना घेऊन ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथून दिल्लीत दाखल झाले. यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि 46 अफगाण शिखांचा समावेश आहे. काबूलच्या गुरुद्वारांमधून काढलेले तीन श्री गुरु ग्रंथ साहिब (Sri Guru Granth Sahib) देखील या विमानातून आणण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri), व्ही मुरलीधरन आणि भाजप नेते आरपी सिंह या गुरु ग्रंथ साहिबांचे स्वरूप (Swaroop) स्विकारण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले. गुरुग्रंथ साहिब त्यांनी डोक्यावर ठेवून ते विमानतळाबाहेर आणले.

शीख धर्माच्या लोकांनी दिल्ली विमानतळावर प्रार्थना केली. या विशेष वाहनात (बस) गुरु ग्रंथ साहिबचे पवित्र स्वरूप ठेवून ते टिळक नगरातील महावीर नगर गुरुद्वारा येथे नेले जाईल.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलाकडून ही मोहीम पार पाडली जात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान भारताच्या एका गुप्त ठिकाणाची चर्चा सुरू आहे. या ठिकाणाबाबत याआधी फारशी चर्चा झाली नव्हती.

काबूल विमानतळावर असलेल्या अफगाण नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गेलेल्या सी-17 या एअरक्राफ्टला आपला मार्ग बदलावा लागला. ताजिकिस्तानमधील गिस्सार सैन्य एअरोड्रोमवर भारताचे एकमेव परदेशी लष्करी तळ आहे. गिस्सार एअरोड्रोम अथवा Ayni हवाई तळ हा ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे जवळील एका गावात आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Kabul