लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं केलं अपहरण, शेतात नेऊन गँगरेप केल्याचा आरोप

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं केलं अपहरण, शेतात नेऊन गँगरेप केल्याचा आरोप

बेपत्ता असलेली ही नववधू हापूर पोलीस स्टेशन हद्दीत हायवे लगत जखमी अवस्थेत आढळून आली.

  • Share this:

हापूर, 19 जानेवारी : उत्तर प्रदेशमधील हापूर (Hapur) इथं रविवारी लग्नसोहळ्यानंतर पहिल्याच रात्री नववधूचं अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हाफिजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

17 जानेवारी रोजी विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर नववधू आपल्या सासरी दाखल झाली होती. सासरी गृहप्रवेश झाल्यानंतर नववधू आणि आपल्या पतीच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सदस्य दोघांना चहा देण्यासाठी गेले असता नववधू खोलीमध्ये नसल्याचं समोर आलं. त्यानंतर घरात शोधला घेतला असता कुठेही तिचा ठावठिकाणा लागला नाही.

नववधू बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या माहेरी समजली त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी तिचा शोधशोध सुरू केला. पण तरीही तिचा कुठेही शोध लागला नाही. त्यानंतर अखेर हाफिजपूर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, आज या प्रकरणाला नवीन वळण मिळालं. बेपत्ता असलेली ही नववधू हापूर पोलीस स्टेशन हद्दीत हायवे लगत जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या तरुणीने आरोप केला की, लग्नाच्या पहिल्या रात्री दोन बुरखाधारी व्यक्तीनी माझं अपहरण केलं आणि 24 तास एका शेतात लपवून ठेवलं होतं. त्यानंतर अत्याचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरूणीचा जाब नोंदवून घेतला आणि तक्रार दाखल केली.  पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलीस पुढील तपास करत आहे.

परंतु,  लग्नाच्या पहिल्याच रात्री अचानक नववधूचं अपहरण करण्यात येत आणि घरापासून जवळपास 15 किलोमीटर दूर हायवेच्या किनाऱ्यावर तिला कुणी सोडलं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हापूर पोलीस या प्रकरणाचं गुढ सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असल्याचं पोलीस अधिक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं.

First published: January 19, 2020, 5:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या