मासिक पाळी म्हटलं की अनेकदा महिलांना त्याचा त्रास होतो. त्यातही नोकरदार महिला असेल तर त्रास सहन करीत तिला कामावर जावे लागते.
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने शनिवारी सांगितले की ते आपल्या महिला आणि ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10 दिवस 'पीरियड लीव' (Period Leave) देणार आहेत. याबाबत झोमॅटोचे CEO यांनी कर्मचाऱ्यांना एक ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिली.
झोमॅटो देशातील काही निवडक कंपनीपैकी एक आहे जेथे महिला कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने पॉलिसी देण्यात आली आहे.
लाइव्हमिंटच्या रिपोर्टमध्ये झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांच्या हवाल्याने लिहिले आहे की, 'पीरियड लीव अप्लाय करतेवेळी कोणताही निषिद्धपणा बाळगू नये. 2008 मध्ये सुरू झालेली फूड डिलिवरी कंपनी झोमॅटो आता देशातील एक प्रसिद्ध कंपनींपैकी एक आहे.
अशातच झोमॅटोसारख्या प्रसिद्ध कंपनीने अत्यंत स्तूत्य निर्णय घेतला असून याची मोठी चर्चा सुरू आहे. देशातील विविध महिलांनी यावर आनंद व्यक्त केला आहे