होली है! गुगल डुडलकडून धूलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

देशभरात आज धूलिवंदनचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 07:37 AM IST

होली है! गुगल डुडलकडून धूलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

नवी दिल्ली, 21 मार्च : देशभरात आज धूलिवंदनचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.  निरनिराळ्या रंगांनी, गुलालानं धूलिवंदनाचा आनंद लुटला जात आहे. गुगलदेखील कलरफूल डुडलच्या माध्यमातून धूलिवंदन साजरा करत आहे. या सणाच्या निमित्तानं गुगलनं विशेष असं डुडल साकारलं आहे. गुगलकडूनही रंगीबेरंगी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. डुडलच्या माध्यमांतून रंग आणि भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. रंगांचा हा सण भारताव्यतिरिक्त जगभरातही वेगवेगळ्या पद्धतीनं धुमधडाक्यात साजरा केला जातो. बुधवारी (20 मार्च) होलिका दहन केल्यानंतरच अनेक ठिकाणी सण साजरा करण्यास सुरुवात केली. पंजाबमध्ये बीएसएफच्या जवानांनीही होळी साजरी केली.तर दुसरीकडे, मुंबईमध्ये होळी साजरी करताना 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेचा म्होरक्या  मसूद अझहरच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याव्यतिरिक्त PUBG खेळाचा देखील पुतळा जाळला गेला.Loading...वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT : गटबाजीच्या खिंडीत सापडले धनंजय मुंडे, कसा काढणार मार्ग?

VIDEO : पुढचा नंबर कुणाचा? गिरीश महाजन म्हणाले, 'मोठी शस्त्रक्रिया पार पडली'

Loksabha election 2019 माढ्यात मोहिते विरुद्ध मोहिते सामना रंगण्याची शक्यता


SPECIAL REPORT : बीडची लोकसभा निवडणूक 'फिक्स मॅच'?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: holi
First Published: Mar 21, 2019 06:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...