राहुल गांधींचा आज 49वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा दिल्या शुभेच्छा

राहुल गांधींचा आज 49वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा दिल्या शुभेच्छा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राहुल गांधींच्या जन्मदिनी काँग्रेस पक्षानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या राजकीय प्रवासासंदर्भातील काही आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. राजकीय प्रवासातील पाच महत्त्वपूर्ण घडामोडी या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

नेमके काय आहे व्हिडीओमध्ये ?

1.राहुल गांधींनी सांगितला भारतीय असण्याचा अर्थ

भारतीय असण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला कोणीही काहीही बोलू देत, खोट गोष्टी सांगू देत, मारहाण करो, अपशब्द वापरो. पण तरीही तुमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेमभावना असावी.

2. देश एकजुट ठेवण्याचं विधान

आपल्याला भारत देशाला पुन्हा एकदा एकत्रित आणायचं आहे. आपल्याला सर्व धर्म, समुदाय, लोक आणि राज्यांना एकत्र आणायचं आहे. धर्म-जात नव्हे, तर सर्वप्रथम देश आहे.

(पाहा :शाळेचा निष्काळजीपणा विद्यार्थिनींच्या जिवावर, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या)3. भारताची नवीन कल्पना

भारतातील वैविध्यपूर्ण विचारांना तुम्ही दाबू शकत नाही. खरंतर ही देशाची ताकद आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: सांगलीचा भन्नाट 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहेत 75)

4. नारी शक्तीला प्रोत्साहन

आयुष्यात अशी कित्येक वळणं येतील ज्यामध्ये लोक तुम्हाला सांगितली की, तुम्ही महिला आहात... तुम्ही ही गोष्ट करायला हवी किंवा ही गोष्ट करू नये. पण तुम्हाला तुमचं उत्तर माहिती असलं पाहिजे.

(पाहा :SEPCIAL REPORT: बैल पोळ्याच्या दिवशी इथे करतात गाढवांची पूजा)5. राहुल गांधी : काँग्रेस आदर्श

तुमच्या मनात माझ्यासाठी राग आहे, द्वेष आहे. पण माझ्या मनात तुमच्यासाठी किंचतसाही द्वेष नाही, अजिबात तुमच्याविरोधात राग नाही. मी काँग्रेस आहे आणि हे सर्वच काँग्रसे आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो'', अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.

SPECIAL REPORT: अबब! 20 नंबरचा बूट तुम्ही कधी पाहिलाय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या