Rahul Gandhi Birthday: राजकारणात येण्यापूर्वी कसं होतं राहुल गांधी यांचं आयुष्य?

Rahul Gandhi Birthday: राजकारणात येण्यापूर्वी कसं होतं राहुल गांधी यांचं आयुष्य?

कॉंग्रेस नेते (Congress Leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज 19 जून रोजी 51वा वाढदिवस (Birthday) आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून: कॉंग्रेस नेते (Congress Leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज 19 जून रोजी 51वा वाढदिवस (Birthday) आहे. या निमित्तानं कॉंग्रेसनं सेवा दिन (Seva Day) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहरू-गांधी घराण्यातील चौथे पिढीतील सदस्य असलेल्या राहुल यांचा नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्यासारखा जादुई प्रभाव नाही. परंतु त्यांच्याकडून नेहमी अशीच अपेक्षा केली गेली आहे. राहुल गांधींचे अनेक हितचिंतक आणि राजकीय विश्लेषक त्यांच्या आणि कॉंग्रेसच्या भविष्याबाबत मंथन करत असतात. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचं आयुष्य कसं होतं याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देत आहोत...

बालपण सार्वजनिक जीवनापासून दूर :

19 जून 1970 रोजी दिल्ली येथे जन्मलेले राहुल हे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचं पहिलं अपत्य आहे. त्यांचं बालपण दिल्ली आणि डेहराडून इथं गेलं. सुरुवातीच्या आयुष्यात ते सार्वजनिक जीवनापासून दूरच होते. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांची आजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) या भारताच्या पंतप्रधान (Prime Minister) होत्या. 1981 ते 1983 दरम्यान त्यांनी उत्तराखंड राज्यातल्या डेहराडून इथल्या डून स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनीही तिथेच शिक्षण घेतलं होतं.

घरीच शालेय शिक्षण; मग दिल्लीत कॉलेज :

1984 मध्ये जेव्हा त्यांची आजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राहुल यांच्या शिक्षणात पहिल्यांदा अडथळा आला. त्यांच्या सुरक्षेला असेलला धोका लक्षात घेऊन राहुल आणि त्याची बहीण प्रियांका यांना 1989पर्यंत घरीच शिक्षण घ्यावं लागलं. 1989मध्ये राहुल यांनी पदवी शिक्षणासाठी स्पोर्ट्स कोट्यातून दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये राहुल यांचं रॅगिंग झाल्याच्या घटनेनं बरीच खळबळ माजली होती. त्यांच्या रॅगिंगचे फोटो प्रसिद्ध झाल्यानं गहजब उडाला होता.

बदलावे लागले कॉलेज :

1990मध्ये राहुल यांनी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला; पण 1991मध्ये त्यांचे वडील राजीव गांधी यांची एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना अमेरिकेतील फ्लोरिडामधल्या रोलिन्स कॉलेजमध्ये जावं लागलं. तिथून त्यांनी 1994मध्ये बीएची पदवी घेतली.

नाव बदलून केलं एमफिल :

1995मध्ये राहुल यांनी डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमफिल करण्यासाठी केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; मात्र कुटुंबाला असलेल्या धोक्यानं राहुल यांचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे त्यांनी नाव बदलून शिक्षण पूर्ण केलं. तिथे त्यांचं नाव सू राहुल विंसी असं नोंदवण्यात आलं. त्यांचे वडील राजीव गांधी आणि आजीचे वडील जवाहरलाल नेहरू हे देखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनीही इथूनच पदवी प्राप्त केली होती.

शिक्षणानंतर नोकरी :

पदवी घेतल्यानंतर राहुल यांनी लंडनमध्ये (London) मॉनिटर ग्रुप नावाच्या एका सल्लागार कंपनीबरोबर तीन वर्षे काम केलं. मायकेल पोर्टर यांनी ही कंपनी स्थापन केली होती. 2002मध्ये मुंबईतील ते बॅकोप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या तंत्रज्ञानाधारित आउटसोर्सिंग कंपनीचे संचालक बनले.

2004मध्ये राजकारणात प्रवेश :

राहुल यांनी 2004 मध्ये राजकारणात (Politics) प्रवेश केला. नेहरू-गांधी घराण्याचा वारसा म्हणून कॉंग्रेस पक्ष सांभाळण्याची जबाबदारी पेलताना वारंवार त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मे 2004मध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या मतदारसंघातून म्हणजेच उत्तर प्रदेशमधल्या अमेठीमधून निवडणूक लढविली आणि लोकसभेचे (Loksabha) सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली.

Published by: Pooja Vichare
First published: June 19, 2021, 4:58 PM IST

ताज्या बातम्या