Home /News /national /

Birthday Special: पं. नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर

Birthday Special: पं. नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा आज वाढदिवस. मनमोहन सिंग यांना भारताचे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीदेखील राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

    मुंबई, 26 सप्टेंबर : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा आज वाढदिवस. अर्थशास्रज्ञ ते पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे आजही कौतुक होते. 1932 सली त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात झाला. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपल्या निर्णयांनी देशाच्या विकासात हातभार लावला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधांनापदाचे दोन कार्यकाळ पूर्ण करणारे मनमोहनसिंग हे दुसरे पंतप्रधान आहेत. स्वत: पं. जवाहरलाल नेहरू यांनी दिली राजकारणात येण्याची ऑफर मनमोहन सिंग यांना भारताचे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीदेखील राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. 1962 मध्ये त्यांना आपल्या सरकारमध्ये येण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी मनमोहन सिंग यांना दिली होती. पण तेव्हा अमृतसरमध्ये शिक्षकाची नोकरी करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी राजकारणात येण्यास नकार दिला.  खरं तर मनमोहनसिंगांना राजकारणात आणण्याचं खरं श्रेय जातं ते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना. त्यांनी मनमोहन सिंग यांना 1991 साली आपल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनवले. त्यानंतर मनमोहन यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेण्यात आले. जन्मतारखेबद्दल आहे ही गंमतीची गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26 सप्टेंबर ही त्यांची खरी जन्मतारीख नाही. त्यांच्या कुटुंबियांनादेखील त्यांची खरी जन्मतारीख माहीत नाही. शाळेच्या दाखल्यावर ही तारीख असल्याने याचदिवशी त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर त्यांना हिंदीदेखील वाचता येत नाही. त्यांची भाषणं त्यांना उर्दूमध्ये लिहून दिली जातात. त्यानंतर ते सराव करून भाषण करतात. मनमोहन सिंग 'अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' होते? मनमोहन सिंग यांना 'अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' म्हणून ओळखले जाते. या नावाने त्यांच्यावर पुस्तक लिहिले गेले आहे त्याचप्रमाणे एक चित्रपट बनविण्यात आला होता. हे खरे आहे की 2004 मध्ये अचानक त्यांच्यासमोर पंतप्रधान होण्याची संधी आली. 2004 मध्ये एनडीएचा इंडिया शायनिंगचा नारा फसला होता. निवडणुकीनंतर कॉंग्रेस सर्वात मोठा संसदीय पक्ष बनला. यावेळी पंतप्रधान पदाच्या दावेदाराबाबत प्रश्न उपस्थित झाला. सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा त्यावेळी जोर धरू लागला होता.  कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. यासाठी कॉंग्रेसमध्ये अनेक दिवस नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी कॉंग्रेस नेते गंगा चरण राजपूत डोक्याशी रिव्हॉल्व्हर ठेवून निदर्शन देखील केले होते. यानंतरही गंगाचरण राजपूत पक्षात किरकोळ राहिले. ज्यांना कोणताच विरोध होणार नाही अशी व्यक्ती निवडणे सोनिया गांधींसमोर आव्हानात्मक होते. पंतप्रधानपदासाठी अर्जुन सिंह आणि प्रणव मुखर्जी यांची नावे जोर धरू लागली होती.  हे दोन्ही नेते सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय होते, पण दोघांपैकी एकाची निवड केल्याने पक्षात वाद वाढू शकला असता. परिणामी डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. मनमोहनसिंग यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विविध पदांवर काम केलं आहे. जगभरातील काही उच्चशिक्षित पंतप्रधानांपैकी ते एक आहेत.  मनमोहनसिंग यांनी अर्थशास्र विषयात गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्याचबरोबर अनेक मानद पदव्यादेखील त्यांना मिळाल्या आहेत. देश-विदेशांतील अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत.  डॉक्टर ऑफ लॉ, डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ, डॉक्टर ऑफ सोशल सायन्स, विविध विद्यापीठांकडून डॉक्ट्रेट ऑफ लेटर्सची उपाधी त्यांना मिळाली आहे. 1991 मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठी मदत झाली होती. 2008 मध्ये अमेरिकेबरोबरचा अणूकरार आणि 2009 मध्ये केलेल्या शेतकरी कर्जमाफीमुळेदेखील देशभरात त्यांच्या निर्णयांचं कौतुक करण्यात आलं होतं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Manmohan singh

    पुढील बातम्या