Happy Birthday Ranjan Gogoi : राज्यसभेचं वेतन आणि भत्तेही घेत नाहीत हे माजी सरन्यायाधीश

Happy Birthday Ranjan Gogoi : राज्यसभेचं वेतन आणि भत्तेही घेत नाहीत हे माजी सरन्यायाधीश

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (CJI Ranjan Gogoi) यांचा आज 66 वा वाढदिवस. राम जन्मभूमीचा (Ram Janmabhumi) अनेक दशकं सुरू असलेला वाद या न्यायमूर्तींच्या कारकिर्दीतच मार्गी लागला होता. त्यांच्याबद्दल फारशा माहीत नसलेल्या 10 गोष्टी.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेणारे, ऐतिहासिक न्याय करणारे भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (CJI Ranjan Gogoi) यांचा आज 66 वा वाढदिवस. राम जन्मभूमीचा (Ram Janmabhumi) अनेक दशकं सुरू असलेला वाद या न्यायमूर्तींच्या कारकिर्दीतच मार्गी लागला होता. भारतीय न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च सरन्यायाधीश या पदावरून निवृत्त झालेल्या गोगोईंची 19 मार्च 2020 ला राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक झाली. पण ते सध्या राज्यसभा खासदाराचा पगार किंवा भत्ते काहीच घेत नाहीत.

18 नोव्हेंबर 1954 ला रंजन गोगोई यांचा जन्म आसाममधील दिब्रुगडमध्ये झाला. सरन्यायाधीशपदाची दरमहा 82 हजार 301 रुपये पेन्शन आणि भत्ते ते घेतात. पण राज्यसभेचे भत्ते आणि खासदार म्हणून वेतन ते घेत नाही. सरन्यायाधीशपदी असताना त्यांनी संपत्ती जाहीर केली होती त्यानुसार त्यांच्याकडे स्वत: च घर नव्हतं. त्यांनी कुठलं कर्ज घेतलं नव्हतं. फक्त गुवाहाटीत 69 लाख रुपये किमतीची जमीन त्यांच्या नावे आहे जी त्यांनी खूप आधीच विकत घेतली होती. त्याचबरोबर बँकेत पैसे होते. त्यांचे बंधू अंजन गोगोईंनी एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की वडिलांच्या इच्छेसाठी रंजन यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परी दिली होती व ते पास झाले होते. नंतर त्यांनी वडिलांना सांगितलं की तुमची इच्छा पूर्ण केली आणि सिलेक्टही झालो पण आता मी मनाप्रमाणे करिअर करणार आहे. गोगोई सरन्यायाधीश असताना अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागला. आता रामजन्मभूमी न्यासाला मिळालेल्या जमिनीवर  प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहत आहे.

रंजन यांच्याबद्दल जाणून घेऊ 10 महत्त्वाच्या गोष्टी.

1 रंजन गोगोईंनी 03 ऑक्टोबर 2018 ला भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते देशाचे 46वे सरन्यायाधीश होते. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते या पदावर होते.

2 रंजन गोगोई मूळचे आसामचे असून त्यांच्या कुटुंबात वकिली आणि राजकीय वारसा आहे. त्यांचे वडिल केशबचंद्र गोगोई वकील होते आणि आसमचे माजी मुख्यमंत्रीही होते.

3 रंजन गोगोईंचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 ला झाला. त्यांनी 1978 में वकिली सुरू केली. बरीचशी प्रॅक्टिस गुवाहाटीतच केली.

4 28 फेब्रुवारी 2001 ला ते गुवाहाटी हायकोर्टाचे जज झाले. नऊ वर्षांनी 9 सप्टेंबर 2010 ला त्यांची बदली पंजाब व हरियाणा हायकोर्टात झाली. 12 फेब्रुवारी 2011 ला जस्टिस गोगोई पंजाब व हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले.

5 सौम्या खून प्रकरणात फेसबूक पोस्ट लिहून न्यायालयाच्या निर्णयावर टीका करणारे सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजूंना रंजन यांनी सुप्रीम कोर्टात बोलवून घेतलं होतं. गोगोईंच्या अध्यक्षतेखालील बेंचसमोर सुनावणी झालेल्या प्रकरणात कोर्टानी आरोपीला बलात्कारासाटी दोषी ठरवलं होतं पण खुनी म्हटलं नव्हतं. त्यावर काटजूंनी फेसबूक पोस्टद्वारे टीका केली होती. पण न्यायालयाचा अपमान केल्याची नोटीस गेल्यावर काटजू सुप्रीम कोर्टात हजर झाले आणि त्यांनी पोस्टसाठी माफी मागितली होती.

6 माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम, जस्टिस रंजना प्रकाश देसाई आणि जस्टिस रंजन गोगोईंच्या बेंचनीच ईव्हीएम आणि मतदानपत्रिकेत नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता.

7 सरन्यायाधीश होण्याआधी माजी जस्टिस जे. चेलामेश्वर, मदन लोकूर व कुरियन जोसेफ यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेच्य माध्यमातून भारतीय न्याय व्यवस्थेत बोकळलेल्या अव्यवस्थेबद्दल बोलून गोगोई वादात सापडले होते. त्या वेळी दीपक मिश्रा सरन्यायाधीश होते.

8 गोगोई कुटुंबियांसोबत मंदिरांत जातात आणि पूर्जाअर्चनाही करतात. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण दिब्रुगडच्या डॉन बॉस्को स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं.

9 गोगोईंच्या कारकिर्दीत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी), खासदार व आमदारांसाठी विशेष कोर्ट स्थापना करणं, राजीव गांधींच्या खुन्यांची शिक्षा कायम ठेवणं तसंच लोकपालची नियुक्ती या निर्णयांचा समावेश आहे.

10 त्यांच्या कुटुंबात पत्नी रुपांजली गोगोई आणि दोन मुलं आहेत. त्यांचे बंधू अंजन गोगोई हे भारतीय वायूसेनेतून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 18, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading