श्रीनगर, 26 जून: भारतीय सैन्यानं (Indian Army) दहशतवाद्याला (Terrorist) सरेंडर करण्यासाठी हटके आयडिया वापरली आहे. शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात हांजीपोरामध्ये (Hanjipora) स्वतःहून दहशतवाद्याला सरेंडर केलं आहे. सैन्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरही त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हांजिपोरामध्ये (Operation Hanjipora) दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर आणखी एक दहशतवादी लपून बसला होता. ज्याला सैन्याच्या जवानांनी आपल्या हटके स्टाईलनं आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं.
A precious life from #Shopian was saved today, when a misguided youth who had recently joined LeT, surrendered during Op Hanjipora#IndianArmy remains steadfast in its commitment to accept surrenders of local youth, who want to shun violence and return to the national mainstream. https://t.co/wIGFFD6mlp pic.twitter.com/o33v9O0Bw7
— Chinar Corps - Indian Army (@ChinarcorpsIA) June 25, 2021
सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्याला त्याच्या कुटुंबाचा आणि मित्राचा माहिती दिली. त्यानंतर दहशतवादी त्याच्या एके56 रायफलसोबत सरेंडर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. घटनास्थळी पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) करण्यास सुरु केली. त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा लपून बसला होता.
हेही वाचा- ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का
या चकमकीत भारतीय सैन्याची एक तुकडी सहभागी होती. एक दहशतवादी ठार झाल्यानंतर जवानांनी या परिसराला घेराव घातला आणि अन्य दहशतवाद्याला शरण येण्याचं आवाहन केलं. जवानांनी दहशतवाद्याला सांगितले की, हातातलं शस्त्र सोडून बाहेर आलास तर काही होणार नाही. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्याला त्याच्या कुटूंब आणि मित्रांचा संदर्भ दिला. जवानांनी म्हटलं, आपल्या कुटुंबाचा विचार कर, तुझ्या साथीदाराचं काय झालं त्याचा विचार कर, तू गेल्यानंतर तुझ्या कुटुंबाचं काय होईल, त्याबद्दल विचार कर.
भारतीय सैन्याच्या या भावूक आवाहनानंतर दहशतवाद्यानं स्वतःहून सरेंडर केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Jammu and kashmir, Terrorist attack, Terrorists