News18 Lokmat

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

भोपाळ-मिसरौद भागातील रोहित सिह नामक माथेफिरुच्या तावडीतुन सुटलेल्या एका मॉडेलने त्याला आधी फाशी द्या अशी मागणी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 09:46 PM IST

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

भोपाळ, ता. १४ जुलै : मिसरौद भागातील रोहित सिह नामक माथेफिरुच्या तावडीतुन सुटलेल्या एका मॉडेलने त्याला आधी फाशी द्या अशी मागणी केली आहे. मी जर त्याला लगनासाठी होकार दिला नसता, तर त्याने मला संपवून टाकले असते, असेही तीने न्यूज18 सोबत बोलताना स्पष्ट केले. रोहितने केलेल्या हल्लात ती जखमी झाली असून, तीला उपचारार्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे 

पिडित युवतीने दंडाधिकाऱ्यासमक्ष दिलेल्या बयाणात म्हटले की, मुंबईत 12 तासांचा एक हाय व्होल्टेज ड्रामा पार पडला. त्यात आम्ही दोघेही सहभागी झालो होतो. कार्यक्रमादरम्यान रोहितने दोघेही लग्न करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्याने दोघांच्याही सह्या असलेला एक लेखी पुरावाही जाहीर केला, ज्यात दोघेही लग्नासाठी तयार असल्याचे नमुद केले होते. मात्र, मी आपला जीव वाचवीण्यासाठी त्याला होकार दिला आणि त्या कागदावर सही केली होती असे युवतीने म्हणटले आहे.

एका पक्षाने उडवली एकनाथ खडसेंची झोप

Loading...

आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला संपवून मी सुद्धा आत्महत्या करेन अशी तो वारंवार धमकी देत होता. 28 फेब्रुवारीला त्याने मला पिस्तोल दाखऊन धमकावलेही होते, असेही युवतीने सांगितले. मला त्याच्याशी लग्न करायचे नाही, असे म्हणत युवतीने माथेफिरुला रोहित सिहला फाशी द्या अशी मागणी केली आहे. डॉक्टरांनी तीची प्रकृती नाजुक असल्याचे म्हटले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...