'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी!

अखेर आज सहा वर्षांनंतर हमीद आपल्या मायदेशी परतला. पण त्याची झाराशी काही भेट झाली नाही.

  • Share this:

अभिनेता शाहरूख खान आणि प्रिती झिंटा असलेला 'वीर झारा' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. अशीच प्रेमकथा सत्यात उतरली. मुंबईचा हमीद अन्सारी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानात पोहोचला. पण झाराची भेट तर झाली नाही उलट 6 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगून तो आज मायदेशी परतला.

  हमीद हा मुंबईत वर्सोव्यात राहणारा तरुण. फेसबुकवरुन एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्या तरुणीच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या हमीदने तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.

  आपल्या 'झारा'ला भेटण्यासाठी तो थेट अफगानिस्तानला गेला तिथून तो पाकिस्तानात गेला. पाकिस्तानात गेल्यावर पाकची गुप्तचर संस्थेनं अन्सारीला 2012 मध्ये ताब्यात घेतलं होतं आणि 2015 मध्ये लष्कराच्या कोर्टानं हामिदनं  पाकिस्तानी बनावट ओळखपत्र सोबत बाळगल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

  15 डिसेंबर 2015 पासून शिक्षा सुनावल्यानंतर 33 वर्षीय हामिद अन्सारी हा पेशावर येथील कारागृहात शिक्षा भोगत होता.

  अचानक हमीद बेपत्ता झाल्यामुळे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हामिद हा पाकिस्तानात असल्याचं कळालं होतं.

   तेव्हापासून गेली सहा वर्ष मुंबईतले त्याचे नातेवाईक हमीदच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. कोर्टाबाजीनंतर पेशावरमधल्या कोर्टानंही त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांनी हमीदच्या कुटुंबीयांना मदत केली.

  हामिदच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेऊन त्यांना प्रकरण समजावून सांगितलं. शेवटी मंगळवारी 18 डिसेंबरला त्याची सुटका झाली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला पंजाबमधल्या वाघा सीमेवर आणून सोडलं.

   याआधी पाकिस्तानच्या न्यायलयानं हामिदला परत पाठवण्यासाठी महिन्याभरात औपचारिकता पूर्ण करण्याचे सरकारला आदेश दिले होते. परंतु, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याला भारतात पाठवण्यात येत नव्हतं.

याआधी पाकिस्तानच्या न्यायलयानं हामिदला परत पाठवण्यासाठी महिन्याभरात औपचारिकता पूर्ण करण्याचे सरकारला आदेश दिले होते. परंतु, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याला भारतात पाठवण्यात येत नव्हतं.

   अखेर आज सहा वर्षांनंतर हमीद आपल्या मायदेशी परतला. पण त्याची झाराशी काही भेट झाली नाही.

अखेर आज सहा वर्षांनंतर हमीद आपल्या मायदेशी परतला. पण त्याची झाराशी काही भेट झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 08:15 PM IST

ताज्या बातम्या