जेटलींना मिळाला नाही हलवा, 100 कर्मचाऱ्यांना केले इमारतीत लॉक!

जेटलींना मिळाला नाही हलवा, 100 कर्मचाऱ्यांना केले इमारतीत लॉक!

प्रथेनुसार अर्थ मंत्रालयात हलवा पार्टी झाली. पण यंदा या पार्टीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सहभागी होता आले नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी: केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाच्या कागदपत्राची छपाई करण्यास आजपासून सुरुवात झाली. त्याआधी प्रथेनुसार अर्थ मंत्रालयात हलवा पार्टी झाली. पण यंदा या पार्टीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सहभागी होता आले नाही. या पार्टीनंतर अर्थसंकल्प सादर होईपर्यंत मंत्रालयातील 100 कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडू शकणार नाहीत.

काय आहे हलवा पार्टी

प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या आधी नॉर्थ ब्लॉक येथील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात एका मोठ्या भांड्यात हलवा तयार केला जातो. स्वत: अर्थमंत्री या कार्यक्रमात सहभागी होतात. पण या वर्षी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठिक नसल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. मंत्रालयात अशा प्रकारे हलवा करण्याची प्रथा खुप आधीपासून चालत आली आहे. चांगल्या कामाची सुरुवात गोड पदार्थाने करावी हे त्यामागील कारण आहे.

कर्मचारी एका इमारतीत लॉक

अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्रे काही निवड अधिकारीच तयार करतात. या काळात अर्थसंकल्पाचे काम सुरु असलेले सर्व संगणक अन्य नेटवर्कशी डी लिंक केले जातात. या कामासाठी 100 कर्मचारी 2 ते 3 आठवडे नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयातच थांबतात. जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत त्यांना इमारतीच्या बाहेर पडण्याची परवानगी नसते.

नॉर्थ ब्लॉक इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जवळ जवळ लॉक केले जाते. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांचे प्रिंटिंग येथेच केले जाते. अर्थसंकल्पातील गोष्टी बाहेर प्रसिद्ध होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी जाते येते.

VIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading