कोरोनाच्या थैमानाबरोबर आणखी एका आपत्तीची कोसळली वीज, 24 तासांत 28 मृत्युमुखी

कोरोनाच्या थैमानाबरोबर आणखी एका आपत्तीची कोसळली वीज, 24 तासांत 28 मृत्युमुखी

देशभर कोरोनाव्हायरसचं(coronavirus)थैमान सुरू असताना उत्तर भारतात आणखी एक मोठी नैसर्गिक आपत्ती आली. उत्तर भारतात अवकाळी पावसानंही नेमक्या याच वेळी थैमान सुरू केलं आहे.

  • Share this:

लखनौ, 14 मार्च : देशभर कोरोनाव्हायरसचं(coronavirus)थैमान सुरू असताना उत्तर भारतात आणखी एक मोठी नैसर्गिक आपत्ती आली. उत्तर भारतात अवकाळी पावसानंही नेमक्या याच वेळी थैमान सुरू केलं आहे. वादळी पाऊस, गारपीट आणि वीज पडून गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे शेतीचं तर बेसुमार नुकसान झालं आहे.

राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात कालपासून वादळी पावसाचा कहर झाला. 14 मार्चला दुपारी दिल्लीत गारपीट झाली. उत्तर प्रदेशात आदल्या दिवशी झालेल्या वादळी पावसाने तर कहर केला. वादळ आणि विजांमुळे 24 जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी आणि सीतापूर इथे प्रत्येकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अयोध्या, वाराणसी, गोरखपूर, सिद्धार्थनगर, चंदौली, कानपूर ग्रामीण, मिर्झापूर, बलरामपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादळी पाऊस आणि गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  पुढच्या 48 तासांत मदत पोहोचवण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

वाचा - Google इंजिनीअरच्या बायकोलाही कोरोना; Quarantine च्या सल्ल्यानंतरही केला प्रवास

गेले काही दिवस उत्तर प्रदेशात वादळी पावसाने कहर केला. 13 तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आणि जोरदार वादळासह पाऊस पडला. ग्रामीण भागात यामुळे मोठं नुकसान झालं आहे. घराची भिंत पडून, वीज कोसळून आणि झाडं पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. गारपिटीत अडकल्यानेही एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अन्य बातम्या

नवजात बाळालाही Coronavirus, विषाणूची लागण झालेला सर्वात कमी वयाचा रुग्ण

कोरोना प्रभावित देशातून आलेले 335 प्रवासी बेपत्ता, तपासणी न केल्याने धोका वाढला

भयंकर! भर चौकात तरुणाला टोळीकडून जीवघेणी मारहाण, पाहा अंगाचा थरकाप अडवणारा VIDEO

First published: March 14, 2020, 3:58 PM IST

ताज्या बातम्या