मराठी बातम्या /बातम्या /देश /

हाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक, सरकारनं दिलं हे कारण

हाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक, सरकारनं दिलं हे कारण

ही फक्त धुळफेक न ठरता पाकिस्तानने ठोस कारवाई कारावी असं भारताने वारंवार सांगितलं होतं.

ही फक्त धुळफेक न ठरता पाकिस्तानने ठोस कारवाई कारावी असं भारताने वारंवार सांगितलं होतं.

ही फक्त धुळफेक न ठरता पाकिस्तानने ठोस कारवाई कारावी असं भारताने वारंवार सांगितलं होतं.

  • Published by:  Ajay Kautikwar

इस्लामाबाद 3 जुलै :   लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला याला पाकिस्तान सरकारने आज अटक केली. दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात येतेय. विविध सामाजिक संघटना उभारून त्यांच्या नावावर हाफिज हा दहशतवादी संघटनांना अर्थपुरवढा करत होता. दहशतवाद्यांना अर्थपुरवढा करणाऱ्या संघटनांच्या मुसक्या आवळा असं पाकिस्तानला जगभरातून सांगितलं जातंय. मात्र त्यावर ठोस कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे पाकवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आहे.

दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर लक्ष ठेवणाऱ्या Financial Action Task Force (FATF) ने पाकिस्तानला निगरानीखाली ठेवलं आहे. पाकिस्तानने योग्य पावलं उचलली नाहीत तर काळ्या यादीत टाकण्याचा इशारा या संघटनेनं दिलाय. त्यांनी पाकिस्तानला 27 अटी घालून दिल्या आहेत. मात्र त्यातल्या 24 अटींवर पाकने काहीही केलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. या संघटनेनं पाकला काळ्या यादीत टाकलं तर आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच ही कारवाई केल्याचं बोललं जातंय.

'माझीही काही स्वप्नं होती... ', IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

संयुक्त राष्ट्रानेही दिला होता दणका

लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्राने दणका दिला आहे. हाफीजचं त्याचं नाव अतिरेक्यांच्या यादीतून वगळण्यास संयुक्त राष्ट्राने नकार दिला आहे. या यादीतून नाव काढून टाकावं अशी मागणी करणारा अर्ज हाफिज सईदने केला होता.

बंदी असलेल्या जगभरातल्या दहशतवाद्यांची आणि संघटनांची यादी संयुक्त राष्ट्राने केली आहे. दरवर्षी ती यादी अपडेट होत असते. त्या यादीत नाव आल्यावर जगभर त्या संस्थांवर आणि व्यक्तिंवर आर्थिक निर्बंध येतात. त्यांच्या सर्व व्यवहारावरही बंदी येते. अशा व्यक्ती आणि संस्थांसोबत व्यवहार करण्यासही कुणी पुढे येत नाही त्यामुळे या यादीतून त्यांचं नाव वगळावं  अशी मागणी हाफिज सईदने केली होती.

तोयबावर बंदी घातल्यानंतर त्याने जमात उल दवा ही संघटना स्थापन केली होती. ही सामाजिक संस्था आहे असं सांगत त्यान त्या आडून दहशतवादी कारवाया केल्याचं उघड झालं होतं.

'काँग्रेस माझ्या रक्तात आहे', राहुल गांधींचं भावूक राजीनामापत्र

अमेरिकेने जाहीर केलं होतं बक्षीस

हाफिज हा मुंबईवरच्या  दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड समजला जातो. हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेनं एक मोठी घोषणा केली  होती. या हल्ल्याचे मास्टरमाईंड असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला 35 कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलं होतं.

'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ला केला. यामध्ये 166 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

First published:

Tags: Hafiz saeed, Pakistan, Terrorism