हाफिजच्या सुटकेचा उत्तरप्रदेशमध्ये फटाके फोडून जल्लोष

हाफिजच्या सुटकेचा उत्तरप्रदेशमध्ये फटाके फोडून जल्लोष

एकीकडे भारत या सुटकेचा निषेध करतोय तर दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये हाफिज सईदच्या सुटकेच्या जल्लोष साजरा करण्यात आलाय.

  • Share this:

25 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदची पाकिस्तान कोर्टाने सुटका केलीये. एकीकडे भारत या सुटकेचा निषेध करतोय तर दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये हाफिज सईदच्या सुटकेच्या फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय.

हाफिज सईदच्या सुटकेनंतर उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरीमध्ये लोकांना जल्लोष केलाय. ही घटना येथील बेगमबाग आणि लक्ष्मीनगर इथं घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईदच्या सुटकेच्या बातमीनंतर या भागातील काही घरावर पाकचे झेंडे फडकवण्यात आले होते. तसंच याच भागात एका धार्मिक स्थळी फटाके फोडून हाफिजच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या प्रकारानंतर स्थानिक संघ कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाकिस्तानचे झेंडे घरावरून काढले. या प्रकरणी डीएम आकाशदीप यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

First published: November 25, 2017, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading