#PGStory : दीड दिवसांपासून पीत होते 3 मित्र; अचानक एक म्हणाला – ‘याच्या बॉडीचं काय करायचं’

#PGStory : दीड दिवसांपासून पीत होते 3 मित्र; अचानक एक म्हणाला – ‘याच्या बॉडीचं काय करायचं’

रुममेटसोबतचे क्षण खास असतात. कामाच्या व अभ्यासाच्या ताणातून केल्या जाणाऱ्या पार्ट्या आणि त्यातील किस्से आयुष्यभर लक्षात राहतात

  • Share this:

मुंबई, 15 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

ही कहाणी आहे 27 वर्षीय प्रणवची (नाव बदललं आहे) तो 19 वर्षांचा असताना जयपूरहून दिल्लीला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आला होता. या 8 वर्षांत त्याने खूप अनुभव आपल्या गाठीशी बांधले. तो इंजिनीअर होता.

राजस्थान बॉर्डरमधील शहर गंगानगरमध्ये लहानपण गेलं. 8 वीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. 9 वीच्या इयत्तेत गेलो तेव्हा आई-वडील जयपूरला आले. तेथे बाबांचे अधिकतर मित्र पायलट होते. लहानपणापासून त्यांच्याकडून पायलकबाबत इतकं ऐकलंय की आता तर मी कोणाचीही काऊंसिलींग करू शकतो. ते म्हणायचे, पायलट होण्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही. 12 वीत विज्ञान घेऊन 60 टक्के मार्क आणा आणि तुम्ही पायलट झालात.

त्यावेळी मी पायलट या व्यवसायाकडे खूप आकर्षित झालो होतो. त्यामुळे मी दहावी पास झाल्यानंतर 11 वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.  रसायनशास्त्र डोक्यावरुन जात होतं. काही कळतं नव्हतं. 11 वीत मी नापास झालो आणि माझं पायलट होण्याचं स्वप्न तिथेच संपलं.

नापास झाल्यावर असं वाटलं की आपण इतिहासात काहीतरी करू शकतो. मग जयपूरच्या केंद्रीय विद्यालयात इतिहास विषयात 11 वी आणि 12 वीत टॉपर होतो. त्यानंतप सुरू झाला दिल्लीचा प्रवास. दिल्लीत सेंट स्टीफन कॉलेजात मला प्रवेश मिळाला. दिल्लीत बाबांच्या सहकाऱ्याच्या घरी थांबणार होतो. त्यामुळे रिक्षा करुन मी लक्ष्मी नगरला पोहोचलो. पहिल्यांदा दिल्लीच्या लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास केला. मी नेमक्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. नाश्त्याच चहा होता. चहाचा कप खाली ठेवला. तोच आवाज आला जेवून घे. मी शॉक झालो. सकाळी कोण जेवतं? ताटात बटाट्याची भाजी, भात, वरण, पोळी असं सर्व होतं. ते संपवून मी नॉर्थ कॅम्पसला पोहोचलो.

त्यानंतरचा काळ मी बाबांच्या ज्युनिअरसोबत राहत होतो. त्यापैकी कोणी माझ्यापेक्षा 5 तर काही 10 वर्षांनी मोठे होते. या मुलांनी स्पोट्स कोट्यातून प्रवेश घेतला होता. यापैकी अधिकतर डबल एमए करीत होते. ते 8 जण होतं, आणि त्यात सर्वात लहान मी.

पण मला काही त्यांच्यासोबत राहणं आवडत नव्हतं. ते अभ्यास कधीच करायचं नाही..बऱ्याचदा मला त्रास द्यायचे. कामं सांगयचे. शेवटी मी तिथे न राहण्याचा निर्णय घेतला. इतक्या लांबून दिल्लीला काहीतरी करण्यासाठी म्हणून आलो होतो. ती वेळ दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ गेम्सची होती. त्यामुळे इतर सर्व खोल्यांमध्ये खेळाडूंना राहायला दिली होती. त्यामुळे पुढील दोन महिने मला वाट पाहावी लागणार होती. अशात मी बाहेर रुम शोधायला सुरुवात केली. बाहेर घरं खूप महाग होती. अशातच मी आणि माझ्या एका मित्राला शेअरिंगमध्ये 4000 रुपये भाड्याने एक रुम मिळाली. याचा आनंद होता. त्यानंतर मी माझी खोली मनाप्रमाणे सजवली. जागा लहान होती पण मनाप्रमाणे जगता येणार होतं. मी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर खोली सजवली होती.

तर माझा दुसऱा मित्र अत्यंत घाणेरणा होता. तो दररोज अंघोळही नाही करायचा. एके दिवशी तोही खोली सोडून गेला. त्यादरम्यान मी पैशांची बचत करत होतो. मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा मी अनेकदा चालत जात होतो. जिथे मित्र सिगारेटमध्ये पैसे घालवत मी मात्र ते पैसे जमा करीत होतो. त्यामुळे महिन्याकाठी बचत केलेली चांगली रक्कम जमा व्हायची. यातच माझ्या खोलीत राहायला दोघं जण आले. आलेली दोघंजण त्यांच्या खोलीत बसून सिगारेट आणि चिलिम ओढत बसायचे. मला या सर्वांची सवय आणि आवड दोन्ही नव्हती. पण कधीतरी थोड फार प्यायचो इतकचं. एकेदिवशी मी आणि ते दोघं असे तिघेजण आम्ही एकत्र प्यायला बसलो. माझ्या त्या मित्राने रोमोनो आणली होती. मग काय दुपारी आम्ही प्यायला बसलो ते त्या दिवसाची रात्र गेली दुसऱा दिवस उजाडला तरी आम्ही पितच होतो. अगदी दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपर्यत आम्ही इतकं प्यायलो होतो की कोणाला काहीच कळतं नव्हतं. आमचं शरीर सुन्न झालं होतं. अचानक एक मित्र म्हणाला, मी बाटली फोडतो. मी पटकन त्याच्या हातून बाटली खेचून घेतली. तो पुन्हा म्हणाला, ‘यार आपण याच्या बॉडीचं काय करायचं’ माझी दारू तिथंच उतरली. आणि मी त्याच्यावर ओरडलोच..काय म्हणतोयेस तू?

तो म्हणत होता आपण त्याच्या बॉडीच काय करणार, सर्वकाही माझ्या डोक्यावरुन जात होतं. मी आपल्या जागेवरुन उठलो. बाथरुमजवळ पडलेल्या त्या मित्राच्या नाकाजवळ हात ठेवून तपासलं तो जिवंत तर आहे ना...त्याचं पोट दाबलं. श्वास तर तो घेत होता..पोटंही नरम होतं..नंतर मी त्याच्या तोंडात व्होडका टाकली. तो शुद्धीत आला..त्यानंतर आम्ही तिघं तिथेच झोपलो. दुसऱ्या दिवशी उठलो. घर आवरलं. फोन चार्ज केला. या सर्व गोष्टी फोनमध्ये झालेल्या रेकॉर्डिंगमुळे कळू शकली. इतक्या वर्षांनंतरही जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो किस्सा नेहमी आठवतो आणि खूप हसतो.

First published: May 15, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading