फेसबुकवर ओळख झाली आणि पहिल्याच भेटीत त्याने तिला संपवले

फेसबुकवर ओळख झाली आणि पहिल्याच भेटीत त्याने तिला संपवले

तरुणीचा खून केल्यानंतर त्याने तिच्याच फोनवरून कॅब बूक केली. त्यानंतर कॅबचालकालाही ठार केलं आणि कार विकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : दिल्लीत एका मुलीचा खून करून तिचा मृतदेह हरियाणात फेकणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये मृत मुलगी आणि जिम मालक दोघेही 6 डिसेंबरला पहिल्यांदा दिल्लीत भेटले. त्याच दिवशी त्याने मुलीचा खून केला. घटनेच्या आधी एक महिना दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती. आपण पकडले जाऊ या भीतीने तिची हत्या केली. त्यानंतर मुलीच्याच फोनवरून त्याने कॅब बुक केली होती. आरोपीने ज्या कापडाने खूनानंतर रक्त पुसले होते ते पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यानंतर अधिक तपास करताना आरोपीनं धक्कादायक खुलासा केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय जिम मालक हेमंत लांबा याला 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आल्यानंतर त्याला हरियाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. गुरुवारी जयपूर पोलिसांना त्याची कस्टडी मिळाली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीवेळी लांबाने सांगितले की, मुलीची त्याच दिवशी हत्या केली. तेव्हा तो खूप नशेत होता.

फेसबुकवर मैत्री झाल्यानतंर लांबाला जशी अपेक्षा होती तशी ती मुलगी नव्हती. त्यानंतर त्याला संशय होता की तिला दुसऱ्या महिलेकडून पाठवलं आहे ज्या महिलेनं 2016 मध्ये गुरगावमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातही हेमंत लांबाला अटक करण्यात आली होती.

हत्या केल्यानंतर हेमंतने त्या मुलीच्या मोबाइलवरून दिल्ली ते जयपूर कॅब बुक केली होती. जयपुरमध्ये पोहचल्यानंतर त्याने कॅब चालकाचाही खून केला होता. सूरतमध्ये कॅब विकण्याच्या तयारीत असताना डिलरला त्याचा संशय आला. त्या डिलरने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हेमंत लांबाला अटक झाली होती.

पोलिसांनी सांगितलं की, कॅब ड्रायव्हरचा खून केल्यानंतर हेमंतने ज्या कपड्यांनी रक्ताचे डाग पुसण्याचे प्रयत्न केले ते ताब्यात घेतले आहेत. आरोपीला या आठवड्यात न्यायालयात हजर करण्यात येईल. जयपूर पोलिसांनी त्याची कोठडी मागितली होती.

वाचा : 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या क्रिकेटपटूवर काळाची झडप, अपघातात दोघे जागेवरच ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: Dec 29, 2019 12:25 PM IST

ताज्या बातम्या