टीव्ही रिपोर्टरचा हिट अँड रनमध्ये मृत्यू, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या भाजप नेत्याला केलं होतं एक्सपोज

‘डेली टाइम’ वाहिनीचे काकोपथारचे वरिष्ठ वार्ताहर पराग भुयान यांना बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळ राष्ट्रीय महामार्ग 15 वर एका वाहनाने धडक दिली.

‘डेली टाइम’ वाहिनीचे काकोपथारचे वरिष्ठ वार्ताहर पराग भुयान यांना बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळ राष्ट्रीय महामार्ग 15 वर एका वाहनाने धडक दिली.

  • Share this:
    गुवाहाटी, 12 नोव्हेंबर : आसाममधील स्थानिक टेलिव्हिजन वाहिनीवरील पत्रकाराचा गुरुवारी मृत्यू झाला. बुधवारी रात्री राज्यातील तीनसुकिया जिल्ह्यात एका वाहनानं या पत्रकाराला धडक दिली होती. दरम्यान, हा अपघात नसून पत्रकाराची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या पत्रकारानं आपल्या भागातील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामं उघडीस आणली होती, त्यामुळे त्याची हत्या केली असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘डेली टाइम’ वाहिनीचे काकोपथारचे वरिष्ठ वार्ताहर पराग भुयान यांना बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळ राष्ट्रीय महामार्ग 15 वर एका वाहनाने धडक दिली. पराग यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहनाचा क्रमांक मिळाला आहे तसेच फरार असलेल्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. पोलीस प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात आसाम पोलिसांनी अरुणाचल पोलिसांना सतर्क केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. वाचा-ज्याच्या हत्येची केस केली बंद, तो 2 वर्षांनी परतला; पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पराग भुयान यांची हत्याच झाल्याचे ट्वीट केले आहे. राहुल गांधी ट्वीट करत, भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केल्यामुळे आसाममधील या पत्रकाराची हत्या करण्यात आली. आसाम, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये खऱ्या पत्रकारांचा आवाज दाबला जात आहे आणि तमाशा करणाऱ्यांना सुरक्षा दिली जात आहे. वाचा-'मतं खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा', नितीश यांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल वाहन महिलेच्या नावावर पोलिसांनी सांगितले की हे वाहन अरुणाचल प्रदेशातील एका महिलेचे असून तिचा मुलगा चहाची पाने वाहतुकीसाठी हे वाहन वापरतो. टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक नितुमोनी सैकिया यांनी, पोलिसांची ही मनोवृत्ती शंका उपस्थित करत आहे. त्यांनी असेही म्हटले की पराग यांचा संशयास्पद खूनच झाला आहे. संपूर्ण घटनेचा सखोल चौकशी करण्याची मागणी सैकिया यांनी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भुयान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
    Published by:Priyanka Gawde
    First published: