S M L

गुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण

Updated On: Jul 27, 2018 03:01 AM IST

गुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण

गुवाहाटी, 26 जुलै : वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळातील दुर्मिळ अशी घटना गुवाहाटीत समोर आलीय. एका खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाने ह्रदय, यकृत आणि स्वादूपिंड हे ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी नसल्याची आश्चर्यजनक बाब समोर आलीय. डाॅक्टरांनाही या प्रकारमुळे आश्चर्याचा धक्का बसलाय.

नौशाद अली असं या 52 वर्षीय रुग्णाचं नाव आहे. पित्त मूत्राशयात खडडे आढळल्यामुळे उपचारासाठी आर्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा डाॅक्टरांनी तपासणी केली असता. धक्कादायक रिपोर्ट समोर आला. नौशाद अली यांचं ह्रदय, यकृत हे डाव्या बाजूला असल्याचं निदर्शनास आलं. सुरुवातीला डाॅक्टरांना तपासणीत चुकी झाली असावी असा संशय आला. त्यानंतर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली असता सारखाचा रिपोर्ट आला.

 

त्यानंतर डाॅक्टरांनी तज्ञ डाॅक्टरांना बोलावण्यात आलं. या बैठकीनंतर असं समोर आलं की नौशाद हे सीट्स इन्वर्सस ग्रस्त होता हे उघड झाले. म्हणजे एका सामान्य परिस्थितीत ज्यामध्ये मुख्य पेशींच्या अवयवांची उलटसुलट स्थिती आहे किंवा त्यांच्या सामान्य स्थितीवरून प्रतिबिंबित होतात. ही अवस्था जन्मजात असते.

डाॅक्टरांच्या टीमने मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाकरून खड्डा बाहेर काढला. त्यानंतर 21 जुलैला रुग्णालयाने नौशाद यांना डिस्चार्ज दिला.

Loading...
Loading...

हेही वाचा

VIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' !

 माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता,पंकजा मुंडेंचं यु-टर्न

 VIDEO : शिवराज सिंह पायरी चुकले,स्टेजवरून कोसळले

VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 11:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close