गुवाहाटी, 14 जून: क्वारंटाइन सेंटरमध्ये लोक डान्स करताना वेगवेगळे छंद जोपासताना पाहायला मिळाले. एका क्वारंटाइन सेंटरमध्ये तर प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीनं घरही सोडल्याची घटना समोर आली होती. आता गर्लफ्रेंडसाठी दोन तरुणांनी क्वारंटाइन सेंटरमधून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तामेंगलांग इथल्या क्वारंटाईन सेंटरमधील दोन तरुण आपल्या गर्लफ्रेंडला गुपचूप बाहेर पडले. जेव्हा दोघंही पुन्हा क्वारंटाइन सेंटरमध्ये परतले तेव्हा त्यांच्या हातात दारू आणि गांजा होता. हे पाहून क्वारंटाइन सेंटरमधील लोक हैराण झाले.
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या दोन तरुणांना दारू आणि गांजा सिगारेट विकताना क्वारंटाइन सेंटरमध्ये अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं. त्यानंतर अधिकाऱ्यांना संपूर्ण घटना कळली.हे तरुण आधी गर्लफ्रेंडसाठी पळून गेले आणि दारू घेऊन परत क्वारंटाइन सेंटरमध्ये आले. ही संपूर्ण घटना तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.
हे वाचा-COVID-19 : मोठी बातमी! उद्यापासून 'या' राज्यात बंद होणार सर्व क्वारंटाइन सेंटर्स
दोन्ही तरुण जेव्हा क्वारंटाइन सेंटरमध्ये परतले तेव्हा त्यांच्याजवळ 8 लिटर देशी दारू, सिगरेट आणि गांजा होता. या तरुणांना शिक्षा देण्यासाठी जेलमध्ये सध्या पाठवू शकत नाही कारण कोरोनामुळे जेल बंद आहे.
वरिष्ठ पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये या दोन तरुणांना काय शिक्षा देणार असा सवाल उपस्थित केला आहे. कोरोनामुळे जेल बंद आहे. मानवाधिकाराचं उल्लंघन होऊ नये मारहाण करू शकत नाही आणि दंड भरायला सांगून सोडलं तर दारू आणि गांजा जास्त किमतीनं विकतील, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तरुणांचा या कृतीमुळे क्वारंटाइन सेंटरमध्ये मोठी खळबळ उडाली.
हे वाचा-कोविड हॉस्पिटलमध्ये शिरलं पूराचं पाणी, समोर आला अंगावर काटा उभा करणारा VIDEO
हे वाचा-बाप रे! कोरोनावरील उपचारानंतर तरुणाला रुग्णालयानं पाठवलं 8.50 कोटींचं बिल
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.