Home /News /national /

अनोखा प्रयोग! गायीच्या नसांच्या मदतीने डॉक्टरांनी वाचवला चिमुरडीचा जीव

अनोखा प्रयोग! गायीच्या नसांच्या मदतीने डॉक्टरांनी वाचवला चिमुरडीचा जीव

गुरुग्राममधील एका हॉस्पिटलमध्ये एका मुलीच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरांनी गाईच्या नसांची मदत घेतली. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना तब्बल 14 तास लागले.

    नवी दिल्ली, 09 जानेवारी : गुरुग्राममधील एका हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करुन डॉक्टरांनी एका लहान मुलीला जीवनदान दिलं आहे. पण यानंतर डॉक्टरांनी केलेल्या एका खुलाशानं सर्वांनाच धक्का बसला. या मुलीचा लिव्हर ट्रान्सप्लांट करत असताना डॉक्टरांनी गाईच्या नसांची मदत घेतली. गाय हा आपल्या देशातला सर्वाधिक वादाचा मुद्दा आहे मात्र याच गाईनं एका निष्पाप मुलीचा जीव वाचवला आहे. एबीपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार सौदी अरेबियामध्ये जन्मलेल्या एका मुलीला जन्मताज लिव्हरची समस्या होती. तिथल्या डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्यानुसार या मुलीचे आईवडील तिला भारतात घेऊन आले. पण एवढ्या लहान मुलीचा लिव्हर ट्रान्सप्लांट करणं डॉक्टरांसाठी बरंच आव्हानात्मक होतं. पण यावर मात करत गुरुग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपाय शोधला. गाईच्या नसांच्या मदतीनं त्यांनी तिची लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पूर्ण केली. डॉक्टरांनी सांगितलं की या मुलीच्या लिव्हरमधील 8 भागांपैकी 1 भागाचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे आणि यात गाईची नस वापरण्यात आली कारण नव्या लिव्हरला रक्त पुरवठा करण्यासाठी पोर्टल नस या मुलीच्या शरीरात विकसित झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी हा एक अनोखा प्रयोग केला. डॉक्टरांनी दिलेल्य माहितीनुसार गाईच्या नसांच्या मदतीनं लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर या मुलीची प्रकृती स्थिर आहे. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना तब्बल 14 तास लागले. या शस्त्रक्रियेचं विशेष म्हणजे ही जगातली पहिली अशी शस्त्रक्रिया आहे ज्यात लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी गाईच्या नसांचा वापर केला गेला आहे. या मुलीच्या आई-वडीलांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करुन जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. मुलीच्या आईनं सांगितलं की, या मुलीला लिव्हरची गंभीर समस्या होती आणि सौदी अरेबियामध्ये तिच्यावर उपचार करणं शक्य नव्हतं त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी त्यांना भारतात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या दांपत्यानं आपल्या मुलीला उपचारांसाठी भारतात आणलं. आपल्या मुलीवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानं तिचे आई-वडील खूप खूश आहेत.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: New delhi

    पुढील बातम्या