बाबा राम रहीमला 10 नव्हे 20 वर्षांची शिक्षा

दोन्ही प्रकरणात प्रत्येकी 15-15 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. यातील प्रत्येकी 14-14 लाख दोन्ही पीडित साध्वींना देण्यात यावे असे आदेशही कोर्टाने दिले

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2017 08:01 PM IST

बाबा राम रहीमला 10 नव्हे 20 वर्षांची शिक्षा

28 आॅगस्ट : साध्वी बलात्कार प्रकरणी  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला बलात्कार प्रकरणात एकूण 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीये. दोन साध्वींवर अत्याचार प्रकरणात प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमला कोर्टातच रडू कोसळले.

2002 मध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहीमने आपल्याच डेऱ्यातील दोन साध्वींवर तब्बल 3 वर्षं अत्याचार केले. या प्रकरणी दोन साध्वींनी कोर्टात धाव घेतली. तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पंचकुला सीबीआय कोर्टाने राम रहीमविरोधातली याचिका निकाली काढली. आज विशेष विमानाने रोहतक येथील सुनारिया जेलमध्ये आणण्यात आलं. जेलमध्येच कोर्टाची कार्यवाही सुरू करण्यात आली. 2.30 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ आहे त्यामुळे राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयने केली. दोन साध्वींवर राम रहीमने अत्याचार केले नाही तर अशा 45 महिला आहे त्यांच्यावरही अत्याचार झालेत अशी माहिती सीबीआयने कोर्टाने दिली. तर राम रहिमच्या वकिलांनी सामाजिक कार्याचा दाखला देत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

राम रहीमचं कृत्य हे भयंकर आहे. त्याने जे केलं त्यासाठी शिक्षेसाठी पात्र आहे. समाजासाठी मोठ्या पदावर असताना असले कृत्य तुम्हाला शोभत नाही अशा शब्दात सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह फटकारले. कोर्टात न्यायाधीशांनी शिक्षेचा निकाल जाहीर करत असताना बाबा राम रहीमला रडू कोसळलं. कोर्टाने राम रहीमला दोन साध्वींवर अत्याचार प्रकरणी  20 वर्षांची शिक्षा सुनावलीये. तसंच राम रहीमला या दोन्ही प्रकरणात प्रत्येकी 15-15 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. यातील प्रत्येकी 14-14 लाख दोन्ही पीडित साध्वींना देण्यात यावे असे आदेशही कोर्टाने दिले.

कोर्टाच्या निर्णयानंतर सिरसामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी दोन वाहन जाळली. खबरदारी म्हणून चंडीगडची बाॅर्डर सिल करण्यात आले आहे. पंजाब-हरियाणासह 6 राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close