नवी दिल्ली 31 मार्च : राजस्थानचे गुर्जर नेते (Gurjer leader col Kirori lal Bainsla) किरोरी सिंह बैंसला यांचं निधन झालं आहे (Kirori lal Bainsla passes away). ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बैंसला राजस्थानातील गुज्जर चळवळीचा मोठा चेहरा होते. मात्र, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
गुरुवारी सकाळी जयपूर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुर्जर आरक्षण आंदोलनाबाबत बैंसला देशभर प्रसिद्ध झाले होते. उज्वल प्रतिमा असलेले गुर्जर नेते किरोरी सिंह बैंसला यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधून गुज्जर आरक्षणाबाबत मोठं आंदोलन सुरू झालं होतं. देशभर गाजलेल्या या आंदोलनात गुर्जर समाजातील अनेक लोक मारले गेले. बैंसला शेवटच्या श्वासापर्यंत या आरक्षणासाठी लढत राहिले. कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाने गुर्जर समाजात शोककळा पसरली आहे.
स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीत रणशिंग, जंतरमंतर मैदानात होणार हल्लाबोल आंदोलन
गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे निमंत्रक कर्नल किरोरी सिंह बैंसला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. 12 सप्टेंबर 1939 रोजी करौली जिल्ह्यातील तोडाभीम तहसीलमधील मुंडिया गावात जन्मलेले किरोरी सिंग बैंसला हे भारतीय सैन्यात कर्नल होते. निवृत्त झाल्यानंतर कर्नल बैंसला सामाजिक कार्यात गुंतले. त्यानंतर त्यांनी गुर्जर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
यासाठी कर्नल किरोरी सिंग बैंसला यांनी गुर्जरबहुल भागात विविध ठिकाणी सभा घेऊन समाजाला जागृत व संघटित केलं. त्यानंतर अनेक मोठी आंदोलनं झाली. राजस्थानमध्ये भाजपच्या वसुंधरा राजे सरकारच्या काळात कर्नल बैंसला यांनी मोठी चळवळ केली. पुढे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यामध्ये गुर्जर समाजातील अनेक तरुण आणि इतर लोक मारले गेले. पण बैंसला यांनी नंतर सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death