लग्नाआधी एकदा भेटू म्हणत मुलाने केला महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, shaadi.com झाली होती मैत्री!

शादी डॉम कॉमवरून एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 02:44 PM IST

लग्नाआधी एकदा भेटू म्हणत मुलाने केला महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, shaadi.com झाली होती मैत्री!

हरियाणा, 05 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार मॅट्रोमॉनियल साइटवरून समोर आला आहे.शादी डॉम कॉमवरून एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या गंभीर प्रकारामध्ये पीडित महिला बीपीओ (BPO) मध्ये एका उच्च पदावर काम करत असल्यांची माहिती देण्यात आली आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

गौरव मिश्रा असं आरोपीचं नाव आहे. महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप गौरववर करण्यात आला आहे. तर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पीडित महिलेने घटनेनंतर पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करत गौरवने बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेकडून नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार, आरोपी गौरव मिश्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

इतर बातम्या - स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, तरुणींसोबत विवस्त्र होते लोक, अनेक कंडोम सापडले!

Shadi.com वरून झाली ओळख

आरोपी गौरव आणि पीडितेची ओळख Shadi.com या वेबसाइटवरून झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झाली. आपण लग्न करू असं आरोपी गौरवने पीडितेला सांगितलं. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटले. त्यावेळी आरोपी गौरवऩे तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी फरार झाला. पीडित महिलेने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Loading...

कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधान!

कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधान राहा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तर सोशल नेटवर्किंग साइटवर कोणाशीही बोलताना आपली माहिती सांगू नये आणि सावधानता बाळगावी असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...