S M L

नाईट क्लबमध्ये आता या महिलांना 'NO ENTRY'

यापुढे एमजी रोडवरील बारच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या मुलींना बारमध्ये प्रवेश करण्यासाठी गुरुग्राम पोलिसांनी बंदी घातली आहे.

Updated On: Jul 10, 2018 02:02 PM IST

नाईट क्लबमध्ये आता या महिलांना 'NO ENTRY'

हरियाणा, 10 जुलै : गुरुग्रामचा नाईट लाईफ रोड मानला जाणारा एमजी रोड पुन्हा एकदा डान्स बारमुळे चर्चेत आला आहे. यापुढे एमजी रोडवरील बारच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या मुलींना बारमध्ये प्रवेश करण्यासाठी गुरुग्राम पोलिसांनी बंदी घातली आहे. काही दिवसांआधी पोलिसांनी या परिसरात स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये शरीरविक्री सारखा धक्कादायक प्रकार समोर आला. आणि यात 2 मुली, 2 बार मालकांसह 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. बारच्या बाहेर उभं राहणाऱ्या महिला शरीरविक्रीचा व्यवसाय करत असल्याच्या संशयावरून अखेर गुरुग्राम पोलिसांनी मुलींना पब आणि बारमध्ये प्रवेश देण्यास बंदी घातली आहे.

ट्रेनपासून ते प्लेनपर्यंत मुंबईतील पावसाचे लेटेस्ट अपडेट

गुरुग्रामधले अनेक बार आणि पब हे शरीरविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. बारबाहेर उभ्या राहणाऱ्या या महिला मुलांसोबत आत जातात त्यांना फसवतता आणि त्यांच्याकडून शरीरविक्रीचा धंदा करतात असंदेखील पोलिसांचं म्हणणं आहे.

पण आता कोणत्या महिला शरीरविक्रीचा धंदा करतात आणि कोणत्या या मौजमजा करण्यासाठी आल्या आहेत हे ओळखणं म्हणजे पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.

Loading...
Loading...

हेही बातम्या...

Mumbai Rains: मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट

Indigoची स्पेशल ऑफर : 1212 रुपयांत करा 57 शहरांची हवाई सफर

LIVE : भाईंदर ते विरार रेल्वेसेवा पूर्णपणे बंद, शाळांच्या सुट्टीवर सस्पेन्स कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 02:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close