धक्कादायक! परीक्षेसाठी आलेल्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

धक्कादायक! परीक्षेसाठी आलेल्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

हरियाणामध्येही बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका युवकाने तरुणवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

गुरुग्राम (हरियाणा), 11 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. हरियाणामध्येही बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका युवकाने तरुणवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीने तिच्या चुलतभावावर बलात्काराचा आरोप केला आहे. या घटनेने आजूबाजूच्या भागात खळबळ उडाली आहे. असे म्हटले जात आहे की 24 वर्षीय तरुण गुरुग्राम इथे परीक्षा देण्यासाठी आली होती. बलात्काराची ही घटना हॉटेलमध्ये घडली.

ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितलं. परंतु महेंद्रगड येथील रहिवासी पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता पोलिसांना शनिवारी याची माहिती मिळाली. गुरुग्रामचे पोलिस पीआरओ सुभाष बोकन यांनी सांगितले की, महेंद्रगडमध्ये झीरो एफआयआर अन्य कलमान्वये दाखल झाल्यानंतर रविवारी गुरुग्राममधील महिला पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असून पीडितेचे विधान नोंदविण्यात आले आहे.

इतर बातम्या - #MaharashtraPolitics : महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

गुरुग्राममध्ये परीक्षा देण्यासाठी आली होती तरुणी

पीडित मुलगी परीक्षा देण्यासाठी गुरुग्राम येथे आली होती, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तिची चुलतभावाची परीक्षा केंद्रात भेट झाली. यानंतर चुलतभावाने तिला हॉटेलमध्ये एकत्र राहण्यास सांगितले. त्यांनी मिळून सिटी बसस्टँडजवळील हॉटेलमध्ये खोली घेतली. बोकन म्हणाले की, पीडित महिला रात्री खोलीत झोपली होती, त्याच वेळी आरोपीने तिच्याबरोबर बलात्काराची घटना घडवून आणली. त्यानंतर त्याने तिला धमकावले की तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर याचा परिणाम वाईट होईल.

बोकन म्हणाले की, परीक्षा दिवसानंतरही पीडित मुलीने घटनेविषयी कुटुंबीयांना काही सांगितले नाही. परीक्षा दिल्यानंतर ती घरी परतली. काही दिवसांनंतर त्याने आपल्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या - हत्या केल्यानंतर पत्नीचं कापलेलं शीर घेऊन पोलिसांत गेला पती, कारण...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rape case
First Published: Nov 11, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या