आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर मित्रानेच फेकले Acid

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर मित्रानेच फेकले Acid

सायबर सिटीत आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्या मित्राने अ‍ॅसिड (Acid) फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

गुरुग्राम,24 जानेवारी: सायबर सिटीत आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्या मित्राने अ‍ॅसिड (Acid) फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुले शाळेची टॉयलेट साफ करताना ही घटना घडली. यात मुलाचा चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुग्राममधील धनकोट येथे ही घटना घडली आहे.

विद्यार्थ्यांकडूनच साफ केली जात होती टॉयलेट..

मिळालेली माहिती अशी की, धनकोट येथील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. पीडित मुलाने आरोप केला आहे की, शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून टॉयलेट साफ करून घेतात. दुसरीकडे, शाळेचे मुख्याध्यापिका सुशीला देवी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप या गंभीर घटनेची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. दरम्यान, पीडित मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

चार विद्यार्थी करत होते टॉयलेट साफ

सकाळी 10:30 वाजता आठवीचे चार विद्यार्थी शाळेतील टॉयलेट साफ करत होते. त्यात आकाश, भूपेंद्र, हिमांशु आणि शिवमचा समावेश होता. टॉयलेटमध्ये ठेवलेले अ‍ॅसिड आकाशने हुल्लडबाजी करताना शिवमच्या चेहऱ्यावर फेकले.

शाळा प्रशासनाने डॉक्टरांना दिली खोटी माहिती..

शाळा प्रशासनाने डॉक्टरांना खोटी माहिती दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित विद्यार्थी शिवम सायन्यचे एक्सपेरिमेंट करत असताना रसायनाने त्याचा चेहरा भाजला, अशी माहिती डॉक्टरांना देण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना कोणतीही सुचना न देता, शिवमवर उपचार सुरू केले. एवढेच नाही तर एका शिक्षकाने शिवमच्या हातात हजार रुपये टेकवून याबाबत घरी कोणाला काही सांगू नकोस, असेही सांगितले.

First published: January 24, 2020, 5:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या