News18 Lokmat

काश्मीरमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी एका संशयीत दहशतवाद्याने खुशबू जान नावाच्या महिला पोलिस अधिकारी (SPO)ची गोळ्या घालून हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 07:19 PM IST

काश्मीरमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या

जम्मू, 16 मार्च: जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी एका संशयीत दहशतवाद्याने खुशबू जान नावाच्या महिला पोलिस अधिकारी (SPO)ची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील वेहिल गावात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका बंदूकधारी व्यक्तीने महिला SPOच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महिला SPO खुशबू गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित करण्यात आले.

गेल्या 3 दिवसातील चौथी घटना

दक्षिण काश्मीरमध्ये अशा प्रकारची झालेली ही चौथी घटना आहे. याआधी गुरुवारी अनंतनाग येथे एका बंदूकधारी व्यक्तीने नॅशनल कॉन्फर्सच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याआधी म्हणजे बुधवारी त्राल येथे अशाच पद्धतीने एका सामान्य व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. तर पुलवामा डोगरीपोल परिसरात एका व्यक्तीच्या घरात बंधूकधाऱ्याने प्रवेश केला होता. संबंधित बंदूकधाऱ्य़ाने अहमद खान या व्यक्तीचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या केली होती.


Loading...



VIDEO : अजित पवारांची सुजय विखेंवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...