शोपियानमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

  • Share this:

शोपियान, 13 एप्रिल : दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं. सकाळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली. त्यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा देखील समावेश आहे. शोपियानमधील गहंद या ठिकाणी जवानांनी कारवाई केली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत अनेक टॉपच्या कमांडरचा खात्मा देखील करण्यात आला आहे. जवानांवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी देखील प्रत्युत्तर देत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गस्तीवर असणाऱ्या जवानांच्या तुकडीवर हल्ला करणं, जवानांच्या कॅम्पवर हल्ला करणं अशा गोष्टी सध्या घडत आहेत. त्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे.

सैन्याला पूर्ण अधिकार

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहिद झाले. त्यानंतर सरकारनं भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत. कारवाई दरम्यान जवान जखमी, शहीद होऊ नयेत यासाठी गाईड लाईन देखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करा असे आदेश देखील देण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह अनेक टॉपच्या दहशतवाद्यांना यमसदनीस धाडण्यात आले. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम देखील राबवली जात असून घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला जात आहे.

VIDEO: 'भाजपसोबत राहायचं असेल तर...' बीडच्या सभेत मुख्यमंत्री आक्रमक

First published: April 13, 2019, 9:46 AM IST

ताज्या बातम्या