बंदुका घेऊन नाचणाऱ्या आमदाराला 'बिग बॉस'साठी आलं निमंत्रण

बंदुका घेऊन नाचणाऱ्या आमदाराला 'बिग बॉस'साठी आलं निमंत्रण

काही दिवसांआधी उत्तराखंडमधल्या एका आमदाराचा बंदुका घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुंवर प्रणवसिंह चॅम्पियन या आमदाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची भाजपमधून हकालपट्टी झाली. आता याच आमदाराला सलमान खानच्या बिग बॉस या टेलिव्हिजन शो चं बोलवणं आलं आहे.

  • Share this:

डेहरादून (उत्तराखंड), 20 जुलै : काही दिवसांआधी उत्तराखंडमधल्या एका आमदाराचा बंदुका घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन्ही हातात चारचार हत्यारं घेऊन हा आमदार नाच करत होता. कुंवर प्रणवसिंह चॅम्पियन या आमदाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची भाजपमधून हकालपट्टी झाली. या आमदाराला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलं.

आता याच आमदाराला सलमान खानच्या बिग बॉस या टेलिव्हिजन शो चं बोलवणं आलं आहे. चॅम्पियनने अजून बिग बॉसला होकार कळवलेला नाही पण बिग बॉसमधून आपल्याला फोन आला होता,असं मात्र त्याने सांगितलं आहे.

कुंवर प्रणवसिंह चॅम्पियन हा हरिद्वारमधल्या खानपूरचा आमदार होता. बंदुका घेऊन नाचतानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर तो चर्चेत आला. आता तो छोट्या पडद्यावरही दिसू शकेल.

मोठ्या हॉटेल्समध्ये मटण म्हणून दिलं जातं कुत्र्यांच मांस, FIR दाखल

चॅम्पियन हा अशा वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्याची अशी प्रकरणं चर्चेत होती. बंदुका घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चॅम्पियनकडच्या 3 शस्त्रांचा परवाना रद्द करण्यात आला होता. हरिद्वारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल त्याला नोटीसही पाठवली आहे.

या व्हिडिओमध्ये चॅम्पियन हा तीन पिस्तुलं आणि एक रायफल हवेत नाचवत होता. मध्येच तो दारूही पित होता. त्याच्यासोबत असलेल्या कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

चॅम्पियनचा बंदुकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याचं निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन झालं.

कुंवर प्रणवसिंह चॅम्पियन याने न्यूज 18 च्या एका पत्रकाराशीही वाईट वर्तन केलं होतं. त्याने या रिपोर्टरला गोळी मारण्याची धमकी दिली आणि मारपीट करण्याचाही प्रयत्न केला होता.

===========================================================================================

VIDEO : मोदी हे जगातले सहावे सर्वात आवडते पुरूष, या आणि इतर टॉप 18 बातम्या

First published: July 20, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading