गुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखांची आज दुपारी एक वाजता घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखांची आज दुपारी एक वाजता घोषणा

मतदान २ टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

  • Share this:

25 आॅक्टोबर : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा आज दुपारी एक वाजता होणार आहे. मतदान २ टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.  निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

हिमाचल प्रदेश निवडणुकीची घोषणा होऊन बरेच दिवस झाले, पण गुजरातची घोषणा अजून बाकी होती. त्यावरून काँग्रेसनं आयोगावर टीकाही केली होती. डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.

16 वर्षांपेक्षा जास्त गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे, यावेळी फरक हा आहे की मुख्यमंत्रीपदी मोदी नाहीयेत. पण तरीही भाजपचा प्रचाराचा मुख्य चेहरा मोदीच आहेत.

First published: October 25, 2017, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading