चिमुकलीला कडेवर घेऊन खेळत होती गरबा, 28 सेंकदात मृत्यूनं गाठलं, पाहा थरारक VIDEO

चिमुकलीला कडेवर घेऊन खेळत होती गरबा, 28 सेंकदात मृत्यूनं गाठलं, पाहा थरारक VIDEO

लग्न सोहळ्यासाठी भरलेल्या घरात अचानक कोसळला दु:खाचा डोंगर, गरबा खेळता खेळता चिमुकलीसकट खाली कोसळली महिला आणि...

  • Share this:

गांधीनगर, 12 डिसेंबर : काळ कधी कुणाला कसा गाठेल आणि कसा चकवा देईल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आनंद साजरा करत असताना महिलेला मृत्यूनं गाठलं आणि क्षणात शोकाकुल वातावरण पसरलं. चिमुकलीला कडेवर घेऊन महिला गरबा खेळत असताना अचानक खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

मृत्यू कधी येईल हे मला ठाऊक नाही. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील गांधीनगरमध्ये घडला. गरबा खेळणार्‍या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला. ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

हे वाचा-संगीताची जादू! 4 महिन्यांपासून होती कोमात, गाणं ऐकताच शुद्धीवर आली

45 वर्षांची महिला कल्पना बेन गढवी आपल्या माहेरी लग्नसमारंभाच्या कार्यक्रमासाठी आली होती. लग्न सोहळ्यात गरब्याचा कार्यक्रम होता. सर्वजण गरबा करत होते. कल्पनाने चिमुकलाल कडेवर घेऊन गरबा करत होती. अचनक गरबा करताना खाली कोसळली. नातेवाईकांनी तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.

वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा हार्ट अॅटेकने जागीच मृत्यू झाला होता. एका क्षणात लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडलं आणि शोककळा पसरली. आनंदानं भरलेल्या घरात आता दु:खाचा डोंगर कोसळला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 12, 2020, 10:27 AM IST

ताज्या बातम्या