VIDEO : विनामास्क फिरणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलाचा लेडी सिंघमने उतरवला माज

VIDEO : विनामास्क फिरणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलाचा लेडी सिंघमने उतरवला माज

महिला पोलिसांने मंत्र्याच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला चांगलीच अद्दल घडवली आहे.

  • Share this:

सूरत, 12 जुलै: मंत्र्याच्या मुलाला सुतासारखं वटणीवर आणल्यासारख्या अनेक सीन आपण सिनेमात पाहिले आहेत. असाच एक प्रकार गुजरातच्या सूरतमध्ये घ़डला आहे. महिला पोलिसांने मंत्र्याच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला चांगलीच अद्दल घडवली आहे. विशेष गोष्ट अशी आहे की एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राजकीय दबाव दाखवणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला कायद्यानं धडा शिकवला आहे.

कोरोना विषाणूमुळे सूरतमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. यादरम्यान सरकारच्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यादव यांनी धडा शिकवला.

हे वाचा-अवघ्या 10 सेकंदात पाडलं जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, पाहा थरारक LIVE VIDEO

हे वाचा-भयंकर! रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून कोरोनाग्रस्ताचा रिक्षातून नेला मृतदेह

या घटनेनंतर मुलाने वडील आणि आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांना फोन केला. मंत्र्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला गाडी परत करण्यास सांगितले. या महिलेनं कानानी यांनाच प्रश्न केला. MLA लिहिलेल्या गाडीतून मुलगा फिरू शकतो असं म्हणताक्षणी मंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या आहे. महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 12, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या