मराठी बातम्या /बातम्या /देश /एकेकाळी गावात व्हायच्या रोज चोऱ्या, ग्रामपंचायतीनं असं पाऊल उचललं की चोऱ्या थांबून गाव झालं डिजिटल

एकेकाळी गावात व्हायच्या रोज चोऱ्या, ग्रामपंचायतीनं असं पाऊल उचललं की चोऱ्या थांबून गाव झालं डिजिटल

गावानं एकत्र येत बदल घडवायचं ठरवलं तर किती काही होऊ शकतं. या गावची कथा खूप प्रेरणादायी आहे.

गावानं एकत्र येत बदल घडवायचं ठरवलं तर किती काही होऊ शकतं. या गावची कथा खूप प्रेरणादायी आहे.

गावानं एकत्र येत बदल घडवायचं ठरवलं तर किती काही होऊ शकतं. या गावची कथा खूप प्रेरणादायी आहे.

वडोदरा, 25 फेब्रुवारी : अनेकदा वास्तवात अशा घटना घडतात ज्या सिनेमापेक्षाही नाट्यमय असतात. अशाच एका सकारात्मक घटनेची कथा या बातमीत वाचायला मिळेल.

ही गोष्ट आहे गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील (Vadodara district Gujrat) गावाची. हे गाव आजघडीला डिजिटल बनलं (Digital village) आहे. इथं हरप्रकाराच्या आधुनिक सोईसुविधा उपलब्ध आहेत.

हे गाव आहे वडोदरा जिल्ह्यातील नडा.(Nada Village) हे गाव कधीकाळी स्मगलर आणि चोरांच्या निशान्यावर राहायचं. (Daily incidents of robbery)आज तिथं जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) लागलेले आहेत. इथं पाणी, रस्ते आणि सांडपाण्याची उत्कृष्ट सुविधा आहे. प्रत्येक घरात नळानं पाणी येतं. गावात दुधाची डेअरीही आहे. गावातल्या लोकांना दुधासाठी बाहेर जावं लागत नाही. सोबतच यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे.

या बदलामध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचं खास योगदान राहिलं आहे. डभोई तहसीलचे पंचायत सदस्य आणि गावाचे रहिवासी भावेश पटेल यांच्या मते, त्यांच्या गावाची लोकसंख्या 1800 च्या आसपास आहे. त्यांच्या गावात पूर्वी जवळपास दररोज चोरीच्या घटना होत असत. गावात स्मगलर फिरायचे. यातून गावात असुरक्षिततेचं वातावरण होतं.

बंगालमध्ये BJP ची जोरदार मोर्चेबांधणी, प्रसिद्ध खेळाडूनंतर आता या 'बंगाली Beauty'चा भाजप प्रवेश

या गोष्टीला ध्यानात ठेवत ग्रामपंचायतीनं सगळ्या गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे ठरवले. (Village Grampanchyat has installed CCTV Cameras all over the village)मागच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेम्बरमध्ये याची सुरवात झाली. आता गावाच्या प्रवेशद्वारापासून शाळा आणि पंचायत कार्यालयात 34 सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत.

जिल्हा पंचायतीकडून हे कॅमेरे लावले गेले आहेत. यांची सतत मॉनिटरिंग केली जाते. गावातल्याच काही लोकांना याची जबाबदारी दिली गेली आहे. लोक शिफ्टमध्ये आपलं काम वाटून घेत याचं मॉनिटरिंग करतात. याच्या मदतीनं शाळेत अभ्यास करणाऱ्या मुलांवरही नजर ठेवली जाते आहे. (School education being monitored)

भावेश सांगतो, की कॅमेराच्या मदतीनं आम्हाला माहीत होतं की आमचं मूल शाळेत अभ्यास करतं आहे की बाहेर फिरतं आहे. मूल चांगल्या प्रकारे अभ्यास करत नसेल तर त्याची तक्रार शिक्षकाकडे केली जाते. सोबतच वर्गात कुठला शिक्षक शिकवतो वा शिकवत नाही यावरही लक्ष ठेवलं जातं.

गावच्या सरपंच वैशालीबेन पटेल (Sarpanch Vaishaliben patel) सांगतात, की आमच्या गावात दोन शाळा आहेत जिथं बोरबार आणि थरगावातील मुलं शिकायला येतात. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानं शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांना मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं सोपं गेलं. आता येणाऱ्या दिवसात आमचं नियोजन आहे ते गावात ठिकठिकाणी सोलर प्लांट बसवण्याचं. यातून लोकांना चोवीस तास वीज उपलब्ध होईल. सोबतच लोकांना महागड्या वीजबिलापासून मुक्तीही मिळेल. यासाठी आम्ही काम सुरू केलं आहे.

वैशालीबेन पटेल यांच्यामते गावात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदा सर्वात जास्त कोरोनाकाळात झाला. त्या सांगतात, की जेव्हा देशभरात लोकडाऊन लागला होता आणि बाहेरच्या लोकांना गावात येऊ दिलं जात नव्हतं तेव्हा कॅमेऱ्यांमुळे आम्हाला या परिस्थितीवर नजर ठेवता येत होती. आम्ही बाहेरून येणाऱ्यांची ओळख पटवून घ्यायचो. त्यांना क्वारंटाईन करायचो. याचा फायदा हा झाला, की आमच्या गावात कोरोनाचं संक्रमण पसरलं नाही.

सरपंच सांगतात, की येत्या काळात गावाला पूर्णतः डिजिटल बनवलं जाईल. याअंतर्गत गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वायफायची व्यवस्था केली जाईल. गावातल्या शाळांमध्ये स्मार्ट क्लास बनवले जातील. मुलांचे संगणक वर्गही सुरू होतील. यातून त्यांना आधुनिक शिक्षण मिळेल.

हेही वाचा सोशल मीडियाने बदललं एका रिक्षाचालकाचं आयुष्य; नातीच्या शिक्षणासाठी मिळाले 24 लाख

सध्या नडा गावात 34 सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. यातून गावाची सुरक्षा वाढली. सोबतच नडा गाव दुसऱ्या गावांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. आता आसपासची गावंही आपलं गाव असंच बनवण्याची योजना तयार करत आहेत. या लोकांनाही वाटतं, की आमच्या गावात सीसीटीव्ही कॅमेरे लागावेत आणि चोरीच्या घटना कमी व्हाव्यात. गाव आधुनिक व्हावं. गुजरात सरकार सुरक्षा सेतू योजनेअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 30% अनुदानही देते आहे.

First published:
top videos

    Tags: Cctv, Gujrat, Inspiring story