ट्रकच्या धडकेत कारनं घेतला पेट, कारचा कोळसा; आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत कारनं घेतला पेट, कारचा कोळसा; आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकनं कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. त्याचवेळी ही धडक खूप भीषण असल्यानं कार रस्त्यापलिकडे गेली आणि पेट घेतला.

  • Share this:

सुरेंद्रनगर, 21 नोव्हेंबर : ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारला भीषण आग देखील लागली. या अपघातादरम्यान आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकची कारला धडक झाली आणि कार रस्त्या ओलांडून थेट पलिकडे कोसळली. या भीषण अपघातादरम्यान गाडीला आग लागली आणि कारमधून बाहेर पडण्याची संधी देखील प्रवाशांना मिळाली नाही.

या भीषण दुर्घटनेमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कार जळून खाक झाली आहे.

हे वाचा-बेपत्ता पत्नीला शोधता शोधता पोहचला मित्राच्या घरी, दरवाजा उघडताच सापडले 2 मृतदेह

भरधाव ट्रकनं कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. त्याचवेळी ही धडक खूप भीषण असल्यानं कार रस्त्यापलिकडे गेली आणि पेट घेतला. कार लॉक झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर येण्यासाठी धडपड करावी लागली मात्र तेवढ्यात आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यानं होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील भरधाव बस झाडावर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2020, 10:24 AM IST
Tags: Gujrat

ताज्या बातम्या