अमरेली, 22 जून : गुजरातमधील अमरेली इथं एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरातील तीन साधूंवर एका महिलेनं बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या साधुंनी तब्बल 7 वेळा बलात्कार केल्याचं या महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. या महिलेनं तक्रार केल्यानंतर या तिन्ही साधुंना अटक करण्यात आली आहे. अमरेली जिल्हा पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दरम्यान, या महिलेने मजुरीच्या नावाखाली या साधुंनी शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची मेडिकल टेस्ट केली असून, त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. पोलीस सध्या या साधुंनी आणखी कोणत्या महिलांवर जबरदस्ती तर केली नाही ना, याचा शोध घेत आहेत.
वाचा-पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत
याआधी राजस्थानमध्ये एका जैन साधुनं गर्भवती महिलेवर केला होता बलात्कार
काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका जैन साधूला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या साधूकडून पोलिसांनी 33 पेन ड्राईव्ह, कंडोम पॅकेट आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी राहत असलेल्या सामुदायिक आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या.या बॅगमध्ये तब्बल 19 मोबाइल फोन, दोन लॅपटॉप, चार हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि 33 पेन ड्राईव्ह होत्या. दरम्यान पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले.
वाचा-सरकारी शेल्टरमधील 57 अल्पवयीन मुली कोरोना पॉझिटिव्ह, 7 आहेत गरोदर
वाचा-VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.