Home /News /national /

बापरे! भरधाव कार डिव्हायडरला आदळून हवेत उडाली, अपघाताचा थरारक Video CCTV कैद

बापरे! भरधाव कार डिव्हायडरला आदळून हवेत उडाली, अपघाताचा थरारक Video CCTV कैद

Car accident भरधाव वेगात असलेल्या गाडीवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला धडकली आणि वर उडाली आणि पलटी झाली.

    सुरत 10 नोव्हेंबर: ड्रायव्हरचं कारवरचं नियंत्रण सुटल्याने सूरतमध्ये एक भीषण कार अपघात (Car accident) झाला. या कार अपघाताचा Live CCTV Video व्हायरल झाला आहे. सूरतच्या वसू भागात हा अपघात झाला. दुपारच्या वेळी एक कार भरधाव वेगाने जात होती. त्याच वेळीड्रायव्हरचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या डिव्हायडरला आदळली आणि हवेत उडून खाली आदळली. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही गाडी श्याम श्याम मंदिरातून वेसूकडे जात होता. त्याच दरम्यान भरधाव वेगात असलेल्या गाडीवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला धडकली आणि वर उडाली आणि पलटी झाली. अपघातानंतर लगेच आजुबाजुच्या दुकानांमधले लोक मदतीसाठी धावून आलेत आणि त्यांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. त्यांना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कार चालक योग्य खबरदारी आणि काळजी न घेता गाडी चालवतात आणि त्यामुळे असे अपघात होतात असं पोलिसांचं म्हणणं आहे. वाहतुक विभागाने अनेकदा सूचना देऊनही त्याचं पालन होत नाही. असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या भागात या आधीही अपघात घडले असून त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. अपघात घडला त्यावेळी या रस्त्यावर वाहतूक नव्हती. जास्त ट्राफिक असती तर आणखी अपघात घडले असते असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Shocking viral video

    पुढील बातम्या