Home /News /national /

भरधाव ट्रकने चिरडलं, सूरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या 13 मजुरांचा मृत्यू

भरधाव ट्रकने चिरडलं, सूरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या 13 मजुरांचा मृत्यू

गुजरातच्या सूरतमध्ये (Surat Accident) भरधाव ट्रकने फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं आहे. यातल्या 13 मजूरांचा मृत्यू झाला आहे.

    सूरत, 19 जानेवारी : गुजरातच्या सूरतमध्ये (Surat Accident) भरधाव ट्रकने फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं आहे. यातल्या 13 मजूरांचा मृत्यू झाला आहे. सूरतच्या किम चार रस्ता परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले सगळे मजूर राजस्थानच्या बन्सवारा जिल्ह्यातील आहेत. रात्री फूटपाथवर झोपलेले असताना ऊसाचा ट्रॅक्टर आणि एका ट्रकची धडक झाली. यामध्ये ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे ट्रक फूटपाथवर आला, आणि फूटपाथवर झोपलेली 18 लोकं चिरडली गेली. 18 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू जागच्याजागीच झाला, यानंतर सगळ्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत, या सगळ्यांना स्विमेर रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या